फडणविसांचा केला ‘गडकरी’, भाजपमध्ये ब्राम्हणांचे खच्चीकरण

Editorial
Spread the love

इच्छा  नसतानाही देवेंद्र फडणवीस  यांना  पक्षश्रेष्ठींनी  उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे प्रकरण  भाजप हायकमांडच्या अंगावर चांगलेच शेकत आहे. फडणवीस कामाला भिडले आहेत. पण वाद चिघळला आहे. आता तर ब्राह्मण महासंघानेही  उडी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसायला लावून भाजपने त्यांचे खच्चीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आहे.

            नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी त्यांचे चारित्र्यहनन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून भाजपमधील तथाकथित नेतेमंडळी देवेंद्र फडणवीस  यांची घोडदौड रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याने भाजपला पुन्हा सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवल्यानंतर भाजप नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना बळजबरीने उपमुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले, असा आरोप ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला.

           फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असेल. मात्र, या सरकारमध्ये मी मंत्री नसेन, असे देवेंद्र यांनी म्हटले होते. परंतु, त्यानंतर काही वेळात दिल्लीतून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील व्हावे, असे निर्देश दिले. देवेंद्र फडणवीस हे यासाठी राजी नव्हते. मात्र, दिल्लीतून वरिष्ठ नेत्यांचे फोन आल्यानंतर ते  राजी झाले. पण सोशल मिडियावर त्यांची फिरकी घेणे सुरु झाले आहे. ‘देशाचा पहिला अग्निवीर’ असे राष्ट्रीय  जनता दलाने आपल्या ट्वीटर हंडलवर म्हटले आहे.  कॉन्ग्रेस नेते आणि प्रख्यात वकील अभिषेक सिंघवी म्हणाले,  फडणवीस हे भाजपचे नवे अडवाणी आहेत. ‘फडणवीस यांनी   मोठ्या आनंदाने उपमुख्यमंत्रीपदाचा स्विकार केला नाही’ अशा शब्दात  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनीही चिमटा काढला आहे.

 237 Total Likes and Views

0 Comments

No Comment.