मोबाईलचा शोध लावणाराच मोबाईल वापरत नाही

Analysis
Spread the love

मोबाईल वापरत नाही असा  माणूस मिळणे अवघड. दिवसातून तास-दोन तास  लोक मोबाईल वापरतात.   दिवसभर मोबाईलवर बोलणारेही असंख्य लोक आहेत. अनेकांचा व्यवसाय तर मोबाईल वर चालतो. पण मोबाईलचा शोध लावणारा  स्वतः मोबाईल फोन वापरत नाही असे तुम्हाला सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल?  ५० वर्षांपूर्वी  मार्टिन कूपरने मोटोरोला कंपनीच्या त्यांच्या टीमचा पहिला  दोन किलो वजनी मोबाइल शोधला. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उभं राहून जेव्हा मार्टिन कूपरने त्याच फोनवरून पहिला कॉल केला तेव्हा त्याचा शोध कितपत यशस्वी होईल याची त्याला कल्पना नव्हती. पण आता तो  लोकांना मोबाईलचा वापर कमी करण्याचा सल्ला देत  आहे.  कारणही तसेच आहे.

एका मुलाखतीत कुपर म्हणाले की, ते २४ तासात फक्त ५ टक्के वेळ मोबाईल वापरण्यात घालवतात.  जे लोक दिवसरात्र मोबाईल वापरतात त्यांचे काय होणार? असे विचारता ते  म्हणाले की, अशा लोकांनी आपला मोबाईल बंद करून थोडं आयुष्य जगावं.

मार्टिनने पहिल्या फोनचा शोध लावला तेव्हा मोबाईल १० तासात चार्ज व्हायचा  आणि मोबाईल फक्त २५  मिनिटे चालायचा. आता पन्नास वर्षांनंतर मार्टिनला असे वाटते की मोबाईलमुळे लोकांच्या जगण्याचा आनंद हरवलाय.

 813 Total Likes and Views

0 Comments

No Comment.