ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी करणारी अभिनेत्री केतकी चितळे ही अटक होऊन जामीनावर सुटली आहे. पोलीस कोठडीत आपल्याला अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागला असा आरोप तिनं नुकताच केला आहे. केतकी म्हणाली, तुरुंगात असताना मला मजबूत राहणं गरजेचं होतं. कारण, एकतर मला बेकायदा पद्धतीनं माझ्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. कुठलंही वॉरंट, नोटीस न देता मला तुरुंगात डांबण्यात आलं. पण मला माहिती होतं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही त्यामुळं मी या सर्व गोष्टींना सामोरी जाणार. पण पोलीस कोठडीदरम्यान, माझा विनयभंग झाला, मला मारहाण झाली. काही तरुणांनी माझ्या अंगावर विषारी काळा रंग टाकला. कळंबोली पोलिसांकडून ठाणे पोलिसांकडे सुपूर्द करत असताना हा प्रकार घडला. इतकं सोसल्यानंतरही मी हसत बाहेर आले. कारण मी तुरुंगातून बाहेर आले होते, पण मी केवळ जामिनावर बाहेर आले आहे, हे लक्षात घ्यायला हवं. माझी लढाई अजून संपलेली नाही.
केतकी चितळे २९ दिवस पोलीस कोठडीत होती. तिच्यावर राज्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये २२ एफआयआर दाखल करण्यात आले होते. यांपैकी एका गुन्ह्यातून तिला जामीन मिळाला आहे, अद्याप इतर २१ गुन्हे कायम आहेत. ह्या सर्वांना तिला सामोरे जायचे आहे. पण ती बिनधास्त आहे.
230 Total Likes and Views