एकनाथ शिंदे फक्त महाराष्ट्रातच आहेत अशातला भाग नाही. बंडखोर आणि त्यांचे नेते जगभर आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतले ४० आमदार फोडले, उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यायला भाग पाडलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.. ह्या बंडाची शाई वाळायची असताना असेच बंड ब्रिटनमध्ये झाले आहे. तिथल्या पंतप्रधानांवर नाराज झालेल्या ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी अवघ्या दोन दिवसात राजीनामे दिले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना या मंत्र्यांनी राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून तिथल्या मंत्र्यांनी प्रेरणा घेतली असेल का?
मुख्यमंत्री भेटत नाहीत म्हणून एकनाथाचे बंड पेटले. तिकडल्या बंडाची कारणं वेगळी आहेत.. तिकडे मंत्र्यांना आपल्याच पंतप्रधानांवर विश्वास राहिलेला नाही, पंतप्रधान चुकीच्या लोकांना पाठिशी घालतात, चुकीच्या गोष्टींना बळ देतात असं या मंत्र्यांचं म्हणणं होतं. करोना काळात लोक बाहेर निघू शकत नव्हते तेव्हा जॉन्सन यांनी सर्रास पार्ट्या केल्याचा आरोप आहे.
पाच महिन्यांपूर्वीच बोरिस जॉन्सन यांनी अविश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे सध्या त्यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला जाऊ शकत नाही.. त्यामुळे पुढील नेता निवडला जाईपर्यंत ते पदावर कायम असतील. मात्र ब्रिटनच्या ह्या बंडाची इकडेही जोरदार चर्चा आहे. तिकडे कोण ‘एकनाथ’ पुढे येतो याची उत्सुकता आहे.
161 Total Likes and Views