येत्या पाच वर्षांत देशातून पेट्रोल संपुष्टात आणून त्यावर बंदी घालण्यात येईल असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खळबळ उडवली आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी बोलत होते. नजीकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर धावतील असे गडकरी म्हणाले.
येत्या पाच वर्षात देशात पेट्रोल संपेल. त्याची जागा नवनवी इंधने घेतील असे सांगून गडकरी म्हणाले की, आता विदर्भात तयार होणारे बायो-इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते आणि ते ७० रुपये प्रति किलो दराने विकता येते.
केवळ गहू, तांदूळ, मका लावून कोणताही शेतकरी आपले भविष्य बदलू शकत नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा प्रदाता बनण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
488 Total Likes and Views