ढगफुटी म्हणजे नेमके काय होते?

Analysis
Spread the love

अमरनाथ गुहेजवळ नुकतीच ढगफुटी होऊन  १५ भाविकांना  जीव गमवावा लागला. हा आकडा  आणखी वाढेल. कारण  ४० पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. घटना वाईट आहे. पण ह्या निमित्ताने ढगफुटी ह्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. ढगफुटी झाल्याचे आपण बरेचदा ऐकतो. पण  म्हणजे नेमके काय होते? काही मिनिटात ३०० कोटी लिटरहून अधिक पाऊस झाला तर काय होते तसे ढगफुटीत होते. ढगफुटीत ढग फुटतात  असे होत नाही.  एका छोट्या भागात कमी वेळात खूप पाऊस पडणे म्हणजे  ढगफुटी.  खूप  पाण्याने भरलेली प्रचंड मोठ्या आकाराची पिशवी आकाशात फुटणे म्हणजे ढगफुटी असे सोप्या शब्दात  सांगता येईल. जेव्हा अचानक २० ते ३० चौरस  किलोमीटरच्या परिसरात एका तासात किंवा त्यापेक्षा कमी वेळात   १०० मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो, तेव्हा त्याला ढगफुटी म्हणतात असे हवामान खाते सांगते.  

                त्यासाठी आधी ढग म्हणजे काय? ते समजून घेतले पाहिजे. ढग हे मुख्यत्वे सूर्याच्या उष्णतेमुळे महासागरावर तयार झालेले वाफेचे ढग असतात.  समुद्राच्या ओलसर वाऱ्यांद्वारे वाहून ते पृथ्वीवर येतात.  वरच्या वातावरणातील ढग थंड झाल्यावर ते थेंबात बदलू लागतात. यालाच आपण पाऊस म्हणतो.  मान्सूनच्या वाऱ्याचे ढग हिमालय पर्वतावर आदळतात आणि हळूहळू मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि एक वेळ अशी येते की काही भागावर घिरट्या घालणारे हे ढग पाण्याने भरलेल्या पिशवीसारखे फुटतात. म्हणजेच, लहान भागात खूप वेगाने पाऊस पडतो. यालाच आपण ढगफुटी म्हणतो.
बद्रीनाथ हिमालयात ३.३०० मीटर उंचीवर आहे आणि केदारनाथ ३५८३ मीटर उंचीवर आहे.  जमा झालेले ढग तिकडे हिमालयावर आदळतात म्हणून तिकडे  ढगफुटीच्या अनेक घटना होतात.

 743 Total Likes and Views

0 Comments

No Comment.