गेल्या काही महिन्यापासून श्रीलंकेमध्ये आर्थिक संकटामुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालल्याचं दिसू लागलं आहे. लोक दिवसेंदिवस आक्रमक होत असताना राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी देशाबाहेर पाळले आहेत. ते मालदीवमध्ये गेले असून तिथून दुबईला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर रानील विक्रमसिंघे यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अनेक भागात कर्फ्यू लागला आहे.
राजपक्षे यांच्या कुटुंबाकडे असणाऱ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, परकीय गंगाजळीचा आटत चाललेला साठा यामुळे अभूतपूर्व परिस्थिती आहे. रोजच्या खायचे वांधे सुरु आहेत. औषधं संपत आली आहेत. “कुणीही आजारी पडू नका किंवा अपघातग्रस्त होऊ नका”, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
416 Total Likes and Views