सुश्मिता सेन ललित मोदीशी लग्न करणार?

Entertainment News
Spread the love

एकेकाळची अभिनेत्री सुष्मिता सेन  तिच्या  खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचं  रोहमन शॉलशी ब्रेकअप झालं. आता ती पुन्हा  लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे.  २०१० मध्ये देश सोडून पळालेले  आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी  यांनी सध्या लंडनमध्ये आहेत. तेथून त्यांनी  ट्वीट करत सुष्मिता सेनला डेट करत असल्याचे म्हटले आहे. लग्न नाही. पण लग्नाचा विचार होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. तसे झाले तर लालीत्चे हे दुसरे लग्न असेल.  वयाच्या ४६ व्या वर्षी आणि तेही ललित यासारख्या  भानगडीबाज पुरुषासोबत  ती काय करते आहे?

           सुष्मिता सेन काही महिन्यांपूर्वी रोहमॉन शॉलसोबत डेटिंग करत होती. १५ वर्षांनी तरुण रोहमॉनसोबत तिचं रिलेशनशीप काही दिवसांपूर्वी संपुष्टात आलं. त्यानंतर सुष्मिताने चक्क ललित मोदीसोबत संसार थाटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ‘मालदीवमध्ये ट्रीप झाल्यानंतर लंडनला कुटुंबांसह परतलो आहे, माझी बेटर हाफ सुष्मिता सेनचा उल्लेख कसा टाळायचा. एक नवीन सुरुवात, एक नवीन आयुष्य, अमाप आनंद होतोय’, असं ट्वीट करताना ललितने मन मोकळे केले आहे.

        सुष्मिता सेनने १९९४ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी फेमिना मिस इंडिया खिताब पटकावला. १९९४ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची ती पहिली भारतीय विजेती होती. पुढे ती सिनेमात आली. १९९६ मध्ये आलेल्या ‘दस्तक’ चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. सुष्मिताने जवळपास ३५ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. बिवी नंबर वन, फिजा, नायक, आंखे, फिलहाल, मै हू ना असे असंख्य चित्रपट गाजले.  अलीकडे भारतातही लग्न न करता एकत्र राहण्याची टूम आली आहे.  सुश्मिता पन्नाशीत येत आहे. पण तिनेही लग्न केले नाही.   तशी ती  १०० कोटी रुपयाची मालकीण  आहे  असे म्हणतात. सध्या तिने सिनेमात काम सोडले. पण  मॉडलिंग करते,  जाहिरातीत  पोज देते. त्यातही तिची   महिन्याची कमाई कोटी रुपये आहे.    सेननं २२ वर्षांपूर्वी दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. त्यांची संपूर्ण काळजी सेन घेते. श्रीमंतांचे जग काही वेगळेच असते. त्यातही त्या  सिनेमावाल्या असतील तर मग बोलायलाच नको.

 229 Total Likes and Views

0 Comments

No Comment.