एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली ; ‘या’ जिल्ह्यात शिवसेनेला पाडले मोठे खिंडार

Editorial
Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसोबत बंडखोरी करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. अद्यापही सेनेत मोठी गळती सुरूच आहे. यापार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे शिवसेना उभी करण्यासाठी मैदानात उतरले आहे. मात्र, तरीही शिवसेनेला (Shivsena)राज्यातील ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठे धक्के लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघर यांसह राज्यातील अनेक ठिकाणांहून शिंदे गटाला पाठींबा मिळत असल्याचे त्यांची ताकद वाढत असल्याचे दिसत आहे.

शिंदे यांनी अमरावतीमध्येही शिवसेनेला खिंडार पाडले आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडत येथील शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. ठाणे येथील उपमहापौर रमाकांत माडावी यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या दर्यापूर तालुका येथील गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला आहे. हा मतदार संघ अमरावतीचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक पार पाडली.

माडावी यांची अमरावती येथे गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशामुळे आता अमरावती जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होते, आता राहिलेत ते अस्सल सोने, असे म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने हे देखील सेनेला रामराम ठोकणार असण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 93 Total Likes and Views

0 Comments

No Comment.