देशात २४ तासांत तब्बल २० हजार नवे रुग्ण, ४९ जणांचा मृत्यू

Editorial
Spread the love

देशात नव्या कोरोना (Corona)बाधितांची संख्या सातत्याने वाढतांना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. देशभरात सलग तिसऱ्या दिवशी २० हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे रुग्ण वाढतीवर असल्याचे समोर येत आहेत.

जे कालच्या तुलनेत २.४ % अधिक आहेत. कोरोनामुळे ४९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी शनिवारी २० ,०४४ , तर शुक्रवारी २० ,०३८ नवे कोरोना बाधित समोर आले होते. येथे २ हजार ८७१ रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर पश्चिम बंगालमध्ये २ हजार ८३९ रुग्ण समोर आले, महाराष्ट्रात २ हजार ३८२ रुग्ण, तामिळनाडूमध्ये २ हजार ३४० रुग्ण तर कर्नाटकात १ हजार ३७४ नवे रुग्ण समोर आले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्र्याने दिली.

 208 Total Likes and Views

0 Comments

No Comment.