स्कूल बसमधून जाणाऱ्या मुली किती सुरक्षित, एकीवर बलात्कार

Analysis
Spread the love

          शाळकरी  मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने पुणे शहर हादरले आहे.  धक्कादायक म्हणजे स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केला आहे. ह्या  स्कूल बस चालकाने शाळेतल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपण रिलेशनशिपमध्ये राहू या असं सांगितलं. पण नेमकं रिलेशनशिप काय प्रकार असतो हेसुद्धा पीडित मुलीला माहित नव्हतं. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने मुलीवर मार्च आणि जूनमध्ये तीन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ३५ वर्षाचा सोमेश्वर घुळे पाटील  असं या आरोपीचं नाव आहे.

              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मुलगी आरोपीच्या स्कूल बसमधून शाळेतून घरी येत-जात असायची. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत आरोपी  मुलीला बोलला की, आपण रिलेशनशिपमध्ये राहू. नेमकं रिलेशनशिप म्हणजे काय असतं पीडिततेला माहितं नव्हतं. याचा गैरफायदा घेत आरोपीने अल्पवयीन मुलीला ३ वेळा वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी नेऊन तिचावर बलात्कार केला. ही सर्व हकीकत मुलीने दोन महिन्यानंतर तिच्या आईला सांगितली आणि एकच खळबळ उडाली. घरच्यांनी तात्काळ कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली.  पोलीस करायचे ते करतील. पण पालक म्हणून समाज काय काळजी घेणार आहे? मुलीला  बसमध्ये सोडले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मानू नका. सध्या जमाना  वाईट आहे.

 465 Total Likes and Views

0 Comments

No Comment.