का सारखा पडतोय रुपया?

Editorial
Spread the love

        रुपयाचं आज डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालं. रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.०५ रुपयांवर पोहोचला. गेल्याकाही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्यानं पडझड सुरु आहे. रुपयाचं मुल्य घसरल्यानं आपल्याला आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी जास्त पैसे देऊन खरेदी कराव्या लागत आहेत. का पडतोय रुपया? का वाढतेय महागाई? अन्नधन्यासारख्या वस्तूवर जिएसटी लावण्याची वेळ सरकारवर का आली? भारताची परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार का? लोकांमध्ये घबराट आहे.

       खासदार शशी थरुर यांनी ह्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. थरूर म्हणाले, मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा रुपया ५० रुपयांवर होता आता तो ८० रुपयांवर पोहोचला आहे. आता जबाबदारीचा प्रश्न कुठे आहे? तुम्हाला आता प्रत्येक आयातीच्या वस्तूसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत कारण रुपयाची किंमत घसरली आहे. तसेच इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत, महागाई वाढत आहे त्याचबरोबर आता जीएसटीचं अतिरिक्त ओझं सर्वसामान्य माणसावर पडलं आहे. मोदीजींनी हा मुद्दा सन २०१४  च्या निवडणुकीचा मुद्दा बनवला. ते सत्तेत आले तेव्हा रुपया मजबूत करणार होते कारण आधीचं सरकार कमकुवत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग आत्ताची परिस्थिती काय आहे? ते आपल्याला मजबूत सरकार देत आहेत का? असा सवालही थरुर यांनी विचारला.

 188 Total Likes and Views

0 Comments

No Comment.