सीबीएसई १२वीचा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर केला आहे. देशपातळीवरील एकूण निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहा टक्क्यांनी घटला आहे. यंदाच्या निकालात एकूण ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, कामगिरीचा विचार केला तर मुलींनी बाजी मारली आहे. ९४.५४ टक्के मुली आणि ९१.२५ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. या परीक्षेत ३३ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत, तर १.३४ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. बुलंदशहरच्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या तनया सिंह हिने ५०० पैकी ५०० गुण मिळवून सर्वांना चकित केले.
यंदा परीक्षा दिलेल्या १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थ्यांपैकी १३ लाख ३० हजार ६६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीबीएसीच्या विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाने ९८.८३ टक्के गुणांसह देशात आघाडी घेतली. त्या खालोखाल बेंगळुरू विभागाचा निकाल ९८.१६ टक्के आणि चेन्नई विभागाचा निकाल ९७.७९ टक्के लागला. नोएडा विभागाचा निकाल सर्वांत कमी ९०.२७ टक्के लागला. विभागीय निकालात पुणे विभाग शेवटून तिसऱ्या स्थानी आहे.
144 Total Likes and Views