बॉलीवूड स्टार रणवीर सिंग याने न्यूड फोटो देऊन खळबळ उडवली आहे. ३७ वर्षे वयाच्या रणवीरनं एका अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठासाठी चक्क नग्न होऊन फोटोशूट केलं. रणवीरच्या या फोटोची चर्चा आहे. काहींनी कौतुक केलं तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केलं.
रणवीरनं ज्या मासिकासाठी हे फोटोशूट केलं, त्या मासिकाकडे आपले मन मोकळे केले. त्यानं सांगितलं की, ‘न्यूड होणं माझ्यासाठी सहज आहे. मी हजार लोकांसमोरही कपडे काढू शकतो. मला त्यानं काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी सोपं आहे, परंतु मी हे असं करणं लोकांना पचणारं आणि पटणारं नाही.’
रणवीरनं पुढं सांगितलं की, ‘मी सिनेमात काम करतानादेखील न्यूड झालो आहे. जेव्हा मी एखादी भूमिका साकारतो तेव्हा माझा आत्मा त्या भूमिकेत घालत असतो. माझ्या मते, ते होणं हेदेखील एकाप्रकारे न्यूड होणंच आहे. ‘मी सिनेमात काम करतानादेखील न्यूड झालो आहे. जेव्हा मी एखादी भूमिका साकारतो तेव्हा माझा आत्मा त्या भूमिकेत घालत असतो. माझ्या मते ते होणं हेदेखील एकाप्रकारे न्यूड होणंच आहे.
रणवीर म्हणतो, ‘मला कामाची भूक आहे. त्यामुळे मी २० -२० तास काम करतो. मी जेवढी मेहनत घेतो त्यामुळे मला माझं आयुष्य मोकळेपणानं, खुलंपणानं आणि मला हवं तसं जगणं आवडतं. मी मेहनत करेन, पैसे कमवीन आणि डोक्यापासून पायापर्यंत गुच्ची ब्रँडचे कपडे वापरेन. आता त्यावरून कुणाला त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही.’
रणवीरला जनतेशी काही घेणेदेणे नसेल. पण लोकलाज ही काही गोष्ट आहे की नाही? वेडेही रस्त्यावर नंगे फिरताना दिसतात. मग त्यात आणि तुझ्यात फरक काय? नट्यांमध्ये कमी कपड्यात राहण्याची स्पर्धा असते. पण आता पुरुषांमध्येही हे लोण आले आहे. भविष्यात काय काय पाहायला मिळणार?
201 Total Likes and Views