पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदीला मोठा झटका आहे. त्यांच्या उद्योग मंत्री पार्थ चटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल २६ तासाच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना उचलले. शिक्षक भरती घोटाळ्यात ही अटक झाल्याने बंगालमध्ये खळबळ आहे. हा घोटाळा झाला तेव्हा पार्थ शिक्षणमंत्री होते.
ईडीने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये छापे टाकले, यात पार्थ चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरी ही छापे टाकण्यात आले होते. या छाप्यात २० कोटी इतकी रोख रक्कम सापडली आहे. अर्पिता ही बंगाली सिनेमात काम करते. तिच्याकडे एवढे पैसे कसे आले? ते शोधून काढण्याचे आव्हान ईडी पुढे आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोग आणि प्राथमिक शिक्षा बोर्डात झालेल्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सीबीआयला सी आणि डी भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली होती. या छाप्यात ईडीला काही महत्त्वाची कागदपत्रे, रेकॉर्ड, कंपन्यांचे तपशील, इलेक्ट्रॉनिक यंत्रे, सोनं आणि परदेशी चलन सापडले आहे. दोड-दोन हजाराच्या नव्या कोऱ्या नोटा पाहून ईडीवालेही चाट पडले. नोटा मोजण्यासाठी मशिनी बोलवाव्या लागल्या. दीदी आता ह्या धाडीवर काय बोलतात त्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
122 Total Likes and Views