दिल्लीत मिळाला मंकीपॉक्सचा रुग्ण

Analysis
Spread the love
      दिल्लीत मंकीपॉक्सचा  पहिला रुग्ण आढळून आला आहे. पश्चिम दिल्लीतील 31 वर्षीय तरुणानं कधीही परदेशात प्रवास केला नव्हता. रुग्णाला लोकनायक रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णाचा नमुना एनआयव्ही पुणे इथं तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.                           

       जगभरात मंकीपॉक्सनं थैमान घातलंय.  ७५ देशात १६ हजारावर रुग्ण सापडले आहेत. आफ्रिकेत ५ रुग्ण ह्या आजाराने मेले आहेत. आता  भारतातही विळखा घट्ट होत चालला असल्याचे  दिसते. दिल्लीचा रुग्ण  देशाबाहेर जेलेला नसतानाही  तो रुग्ण निघाल्याने  डॉक्टरही चक्रावले आहेत. 

     दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाला मंकीपॉक्सच्या रुग्णांसाठी नोडल केंद्र बनवण्यात आलंय. इथं मंकीपॉक्सच्या सर्व रुग्णांवर उपचार केले जात आहेत. केरळमधूनही देशात मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या प्रकरणासह देशात एकूण चार रुग्ण समोर आले आहेत.

    दिल्लीत सापडलेला  ३१ वर्षे वयाचा रुग्ण हा पुरुष असून त्यानं परदेशात प्रवास केलेला नाही. या रुग्णाला ताप आणि त्वचेवर जखम झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णावर दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

दिल्ली सरकारच्या लोकनायक रुग्णालयात मंकीपॉक्सच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सहा खाटांचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

 1,463 Total Likes and Views

0 Comments

No Comment.