देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेतली. दिल्लीतील संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुर्मू यांना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली.
स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. त्या सर्वांत कमी वयाच्या म्हणजे अवघ्या ६४ वर्षे वयाच्या आहेत. पायात साधी चप्पल, अंगावर विणकरांनी हाताने विणलेली संथाली साडी आणि चेहऱ्यावर विनम्र हास्य अशा अवतारात त्या आल्या तेव्हा त्यांच्या साधेपणाची चर्चा सुरु झाली.
या वेळी त्यांनी केलेल्या भाषणानेही लोकांना जिंकले. आपल्या वघ्या १८ मिनिटाच्या भाषणात त्या म्हणाल्या, वॉर्ड काऊन्लिसर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची ताकद आहे. यामुळेच एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते. राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात.”
त्यांनी महान क्रांतिकारी महर्षी अरविंद घोष, भगवान बिरसा मुंडा यांचे यावेळी स्मरण केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही अरविंद यांचे भक्त आहेत. साध्या, सोज्वळ पण खंबीर राष्ट्रपती देशाला मिळाला असे मुर्मू यांच्या बाबतीत म्हणता येईल. ह्या आधी त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. एखादा मोठा सण असला की मुर्मू ह्या स्वतः स्वयंपाक करीत आणि राजभवनातील कर्मचाऱ्यांना जेवायलासुद्धा वाढत. त्या फक्त सात्विक आहार घेतात. त्यांच्या जेवणात मसाल्याचे पदार्थ नसतात. त्या कांदा आणि लसूणसुद्धा खात नाहीत. त्यांची दोन मुले अकाली गेली, नवरा हार्टच्या धक्क्याने गेला. आयुष्यातील ह्या काही घटनामुळे त्या खंबीर, कर्मठ झाल्या खऱ्या. पण काहीतरी करून दाखवण्याची जिद्द अजूनही त्यांच्यात आहे. त्यांच्या भाषणात ती दिसते
260 Total Likes and Views