न्यूडशूट रणवीरला पडणार महागात

Entertainment News
Spread the love

                            बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. रणवीरनं ‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका झाली होती. त्याच्या या फोटोशूटनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका सुरु झाली आहे. हे फोटोशूट करणं रणवीरला महागात पडणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीसांकडे रणवीरच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. एका एनजीओकडून रणवीर सिंगच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीरने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या एनजीओकडून करण्यात आला आहे.  समाजवादी पार्टीचे नेते  अबू आझमी यांनीही   प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.  “जर लोकांसमोर न्यूड होणं ही कला आणि स्वातंत्र्य  असेल तर मग बुरखा परिधान करणं ही महिलांवर जबरस्ती का आहे?” असा सवाल त्यांनी केला आहे.

 रणवीर मात्र बिनधास्त आहे.  एका मुलाखतीत तप म्हणाला,  “लोक माझ्याबद्दल किंवा मी कोणते कपडे परिधान करतो याबद्दल काय बोलतात यामुळे मला अजिबात फरक पडत नाही. मला जे कपडे आवडतात ते मी घालतो. मला जे खाणं आवडतं ते मी खातो. जर ही गोष्ट एखाद्याला आवडत नसेल तर त्यासाठी मी काहीच करू शकत नाही.”

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्याचा आगामी मार्शल आर्टवर आधारित चित्रपट ‘लडकी’मुळे चर्चेत आहे. रणवीरच्या फोटोशूटवर कमेंट करताना राम गोपाल वर्मानं लिंग समानतेचं उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. वर्मा म्हणाला, “विचार करा. त्याचं हे फोटोशूट म्हणजे लिंग समानतेची मागणी आहे. जर महिलांनी शरीर दाखवलं तर आपल्याला आक्षेप नसतो मग पुरुषांनी असं केल्यानंतर त्यावर आक्षेप का घेतला जातो? याबाबतीत पुरुषांना वेगळे नियम लागू करणं हे ढोंग आहे. पुरुषांकडेही महिलांच्या बरोबरीने अधिकार असायला हवेत.”

 266 Total Likes and Views

0 Comments

No Comment.