अर्पिता मुखर्जीच्या घरात सेक्स टॉईज सापडले

Entertainment News
Spread the love

घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडल्यानं गेल्या आठवड्याभरापासून अर्पिता मुखर्जी सोशल मीडियावर चर्चेत आहे. एसएससी घोटाळ्यात  ईडीनं मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चॅटर्जी यांची मंत्रिपदावरून आणि पक्षातील तृणमूल काँग्रेसमधील सगळ्याच पदांवरून हकालपट्टी केली. पार्थ यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जीच्या घरांवरही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. मुखर्जीच्या दोन घरांमध्ये मिळून जवळपास ५० कोटींची रोकड सापडली. यासोबतच ५ किलो सोनं, काही महत्त्वाचे दस्तावेजही हाती लागले.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील घरावर छापा टाकला. या ठिकाणी कोट्यवधींची रोख रक्कम अधिकाऱ्यांना सापडली. घराची झडती घेत असताना अधिकाऱ्यांना काही सेक्स टॉईजदेखील सापडले. बेलघरियाच्या फ्लॅटमधून एकूण २८.९० कोटी रोख आणि ५ किलो सोनं जप्त करण्यात आलं. ही सगळी माया नेण्यासाठी अधिकाऱ्यांना २० ट्रंक आणाव्या लागल्या. मुखर्जीच्या घरातील टॉयलेटमध्ये संपूर्ण रक्कम लपवण्यात आली होती.

अर्पिता मुखर्जीच्या घरावर पहिला छापा २३ जुलैला टाकण्यात आला. त्यावेळी अधिकाऱ्यांना २१ कोटींची रोख रक्कम सापडली. पार्थ चॅटर्जी माझ्या घराचा वापर मिनी बँकसारखा करायचे, असं अर्पितानं सांगितलं. ज्या घरात अधिकाऱ्यांना सेक्स टॉईज सापडले, ते घर अर्पिताचं असल्याचं सांगण्यात येत आहे.

 251 Total Likes and Views

0 Comments

No Comment.