नागपूर : लोखंडी रॉडवर तिरंगा लावत असताना तिघांना शॉक

Editorial
Spread the love

नागपूर : शहरातून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. तिरंगा (Tiranga)लावत असताना लोखंडी पाईपचा वापर केल्याने तिघांना शॉक लागल्याची घटना कन्हानमधील तारसारोड येथे आज सकाळी घडली. यात सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. तिरंगा लावण्यासाठी लोखंडी किंवा स्टील पाईपचा उपयोग धोकादायक असतो. याचा वापर करणे टाळावे अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो, याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन महावितरण व नागपूर येथील ऊद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक यांनी केले आहे.

माहितीनुसार, तारसारोड येथे खासगी शाळेत सकाळी १० वाजताच्या सुमारास राष्ट्रध्वज लावण्यात येत होता. त्यावेळी हातातील पाईप हा ११ केव्ही लाईन वर पडला व त्याच्या वीज प्रवाहाने राऊत यांना शॉक लागला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या शाळेतील श्रीमती गजभिये व अन्य सहकारी यांनाही यावेळी शॉक लागला; परंतु त्याची तीव्रता अधिक नसल्यामुळे कुणालाही गंभीर इजा झाली नाही. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा बंद करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त घरोघरी मोठ्या उत्साहाने राष्ट्रध्वज लावण्यात येत आहे. घरी, रॅली मध्ये किंवा इतर ठिकाणी तिरंगा फडकवण्याकरिता लोखंडी किंवा स्टील पाईपचा उपयोग करण्यात येत असेल तर विद्युत लाईन पासुन काही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच राष्ट्रध्वज लावताना वीज खांब किंवा वीज तार जवळ असणार नाही याची खबरदारी घ्यावी असेदेखील आवाहन विद्युत निरीक्षक यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 96 Total Likes and Views

0 Comments

No Comment.