लीकडे स्वतःशीच लग्न करायचा प्रकार वाढतोय. गुजरातमधील वडोदरा येथील क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने जून महिन्यात स्वतःशीच लग्न केलं होतं. स्वतःशी लग्न करण्याला ‘सोलोगॅमी’ असं म्हटलं जातं. टीव्हीवरील ‘दिया और बाती हम’ फेम नटी कनिष्का सोनीने स्वतःशीच लग्न केल्याचे जाहीर केल्याने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या वाढदिवशी तिने सोशल मिडीयाअवर हे गुपित फोडले.
‘मला पुरुषाची गरज नाही’ असे ती म्हणते. तिने लिहिलं की, “मी स्वतःवर प्रेम करते आणि मला माझ्यापेक्षा प्रामाणिक कोणीही सापडत नाही. त्यामुळे मला पुरुषाची गरज नाही. मी एकटी आणि माझ्या गिटारसह खूप आनंदी आहे. शिव आणि शक्ती हे सर्व माझ्यात सामावलेले आहेत.”
बॉलीवूडमध्ये चर्चेत राहण्यासाठी नट-नट्यांना खूप भानगडी कराव्या लागतात. जगावेगळे वागावे लागते. त्या रणबीर सिंगने न्यूड सीन दिल्यानंतर उठलेले वादळ ताजे आहे. त्यामुळे अनेक नट्या त्या मार्गाने जात आहेत. त्यातलीच कनिष्का मानायची का? काही काळ छोट्या पडद्यावर लहान मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कनिष्काने हॉलिवूडमध्ये चांगले प्रोजेक्ट्स मिळावेत म्हणून टीव्ही इंडस्ट्री सोडली होती. तिला चांगली कामं मिळोत एवढ्या शुभेच्छा देण्यापलीकडे आपण काय करू शकतो?
324 Total Likes and Views