*लोकशाहीला मृतावस्थेत नेणारा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसला..?* – उध्दव ठाकरे.

Editorial
Spread the love

अडीच वर्षांची अतिरेकी दहशतवादी राजवट लादणारे.. क्रूरपणे राबवणारे हुकुमशहा.. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला लोकशाहीबद्दल ही सुतकी भाषा वापरतात हे महाराष्ट्राचं घोर दुर्दैव आहे..! लोकशाहीचा गळा दाबून लोकशाहीला मृतावस्थेत नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदच्युत करताच आज ते लोकशाहीसाठी गळे काढताहेत..! अडीच वर्षांच्या जुलमी राजवटीत राज्य रयतेचा उत्कर्ष, उन्नती, उध्दार करण्याऐवजी महाराष्ट्र उध्वस्त करताना लोकशाही नाही आठवली..? रयतेच्या आशाआकांक्षांच्या ठिकर्‍या करताना लोकशाही नाही आठवली..? अन्याय आघात अत्याचार करुन माणुसकीचा मुडदा पाडताना लोकशाही नाही आठवली..? खंडणी, वसूली, दलालीमार्गे अर्थव्यवस्था खिळखिळी करताना लोकशाही नाही आठवली..? दहशतीचं, दडपशाहीचं जुलुमी विष पाजूून शिवरायांचा महाराष्ट्र मृतप्राय करताना लोकशाही नाही आठवली..? नियतीच्या एकाच तडाख्यात स्वतःची आणि स्वतःच्या शिल्लक पक्षाची मृतप्राय अवस्था दिसू लागताच लख्खकन “लोकशाही” आठवली..?

“तिरंगा फडकवल्यामुळे कुणी देशभक्त होत नाही..!” असं तुम्ही म्हणालात..! अगदी बरोबर आहे साहेब..!
“काँग्रेसच्या मुखातून तुम्ही बोलत आहात..
देशाला फाळणीच्या तराजूत तोलत आहात..!
हे कसं विसरता येईल..? मोदी विरोधातून देश विरोध डोकावतोयं हे कसं विसरता येईल..? तुमच्या उक्तीप्रमाणेच भगवा फडकवल्याने तुम्ही हिंदु होत नाही.. आणि भगवा ओढुन तुम्ही हिंदुत्ववादीही होत नाही हे सुध्दा ध्यानात घ्या..! ही तुमची असंबद्ध, अविवेकी, अतिरेकी मुक्ताफळे उरल्यासुरल्या शिल्लक शिवसेनेला क्षुल्लक करतीलच.. पण बेताल, बाष्कळ, बिनडोक संजय राऊतांचा हा बीभत्स वारसा तुम्हाला कफल्लक करेेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही..! तिरंगा फडकवला म्हणजे त्याचा महोत्सव होतो असं नाही..! तो आपल्या प्रत्येक कृतीतून सदैव फडकत राहिला तरच त्याचा सन्मान, आदर निरंतर वाढत राहिल..!.” तिरंगा ” हा “देव देश धर्म” आहे..! “धर्म प्रथम या राष्ट्र..? मेरे धर्मने सिखाया राष्ट्र प्रथम..!” ही तुमची भूमिका अपेक्षित होती..! “सव्वाशे करोड करकमलांनी तिरंगा डौलाने फडकवा..!” अशा अभिमानी आवाहनाची तुमच्याकडून अपेक्षा होती..! नरेंद्र मोदी वा भाजप द्वेषापायी “तिरंगा” ओलिस ठेवण्याचं पाप करु नका..! सर्वनाशाला निमंत्रण देऊ नका..!

    लहजे बयां कर देते है लोगोंके कि
    परवरिश हुई है या सिर्फ पाले गए है..!

परकोटीची मुजोरी, अर्वाच्च भाषा, स्त्रियांचा अनादर, माजोरडी बॉडी लँग्वेज, अर्थहीन भाष्य आणि हिंसक वृत्तीच्या दुःशासनाने महाराष्ट्राची वस्त्रे फेडली..! महाराष्ट्राला गर्द सावली देणाऱ्या शिवसेना डेरेदार वटवृक्षाच्या तुम्ही फांद्या छाटलात.. पारंब्या देखिल छाटलात.. त्याला पार ओसाड बोडका करुन टाकलात..! “अभ्यास शून्य.. अज्ञान अहंमन्य..| अर्ध्या हळकुंडाने आम्ही धन्य..||” अशा उन्मत्त उन्मादात.. बेबंद, बेधुंद होऊन राज्यशकट मोकाट हाकलात..! “किसीकी खामोशीको उसकी कमजोरी कभी भी मत समझना साहब..!” एहसान फरामशोंको ये एहसास दिलाना था कि तुम एहसान फरामोश हो..! आणि हेच तुम्हाला दाखवायचा यशस्वी प्रयत्न तुमच्याच शिलेदारांनी केला आहे..! स्वच्छ.. नितळ.. पारदर्शक कर्माला गढुळतेची भीती नसते..! तुम्हाला जन्माची अद्दल घडवली म्हणुन ती गद्दारी..! पण काळ्याकुट्ट अंधाराच्या खोल गर्तेतून आपल्या मातृपक्षाला सुरक्षित बाहेर काढणं ही खरी खुद्दारी..! हे पुण्यकर्म आहे हे कळायला.. हे जाणायला निष्कलंक विवेकी मन असावं लागतं..! रावणाच्या नजरेत सुग्रीव, हनुमान, अंगद, बिभीषण हे श्रीरामाचे अंधभक्त होते..! तुमचंही तसंच झालंय..!

      "धटासी आणावा धट.. उध्दटासी पाहिजे उध्दट..!" याच खेळीने शकुनीचा सारीपाट उधळवुन टाकला आहे..! प्रत्येक फासा "जितं मया" होत नसतो.. "नेहले पे देहला".. "ठकास महाठक" भेटतोच..! उध्दवजी.. भले तुम्ही वा तुमचे समर्थक म्हणोत पण आज तुम्ही पक्षप्रमुखही राहिला नाहीत..! फक्त तुमच्या गटाचे तुम्ही प्रमुख उरला आहात..! तुम्हीच मराठी माणसांचे कैवारी.. तुम्हीच महाराष्ट्राचे चालक-पालक-मालक हे खूळचट खूळ आता मनातून समूळ काढुन टाका..! तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही.. किंबहुना तुम्ही महाराष्ट्राचे मक्तेदारही नाहीत..! ठेकेदारही नाहीत..! गिरगिट माहोल देखकर रंग बदलता है.. और इन्सान मौका देखकर..! तुम्ही अचानक तुमचे रंग बदललेत.. मनसोक्त उधळलेत.. चिंंब न्हाऊन निघालेत..! पण काही डाग धुतले गेलेच नाहीत.. ते कायमस्वरुपी तुमची सोबत करणार..! "ह्यापुढे मनाची ठेवा तयारी.. आणि ओळखा स्वतःची पायरी..!" बुरा समय आपको जिंदगीकी उन सही सच्चाईयोंका सामना करवाता है..! "जिंदगी बेहतर तब होती है.. जब आप खुश होते है..! लेकिन जिंदगी बेहत्तर तब होती है.. जब आपकी वजहसे लोग खुश होते है..! बघा आतातरी जमतंय कां..?

      Leadership is a "responsibility" & not "Crown"..! हा जबाबदार फरक समजून घ्या..! "स्वार्थाभोवती दुनिया फिरते.. आणि सौद्यासाठी जुळते नाते..!" पक्षप्रमुखांचे "राजसिंहासन" ते मुख्यमंत्र्याची "तिपायी" हा शारिरीक, मानसिक, वैचारिक आणि आर्थिक फरक अडीच वर्षांत तुम्ही चांगलाच अनुभवलायं..! त्याच वैचारिक भ्रमातून अजूनही बाहेर न पडल्यामुळे ही अशी भ्रमिष्ट वक्तव्ये तुमच्या मुखातून बाहेर पडताहेत..! त्यास आवर घातला नाही..तर

” घुंगरुकी तरह बंधताही रहा हुँ मैं.. कभी इस पगमें कभी उस पगमें.. बजताही रहा हूँ मैं..” हीच वाटचाल तुमच्या नशिबी असेल..! जिंदगीमें हम कितने सही और कितने गलत है ये सिर्फ दो शक्स जानते है.. “परमात्मा और अंतरात्मा”..! बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांची राख करुन धगधगत्या हिंदुत्वाला तिलांजली देऊन त्यावर उभारलेल्या जाणाऱ्या निर्जीव पुतळ्यासारखं निर्जीव भविष्य हीच तुमची ओळख इतिहासात नोंदली जाईल याची आज नोंद घ्या…!

अनंत सामंत
स्तंभलेखक पत्रकार.

 210 Total Likes and Views

0 Comments

No Comment.