शाळकरी मुलगी निघाली गाभण

Nagpur News
Spread the love

घोर कलयुग आले आहे.   वयात आलेल्या तरुण-तरुणींची  लफडी नवी नाहीत.  पण शाळेत जाणाऱ्या मुलीही आता  यामध्ये मागे नाहीत.   लैंगिक संबंध ठेवत आहेत. यातल्या काहींना दिवस जात आहेत.  असाच एक प्रकार नागपूर जिल्ह्यात  उजेडात  आला आहे.  अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे  अचानक पोट दुखायला लागले. त्यामुळे मुलीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. आईला धक्काच  बसला. मुलीला घरी आणल्यानंतरही मुलगी तोंड उघडायला तयार नाही. आम्ही दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचे ती  म्हणते.  प्रियकराचे नावही सांगायला तयार नाही. आता बोला. विशेष म्हणजे मुलीचे आईवडील शेतमजूर आहेत.

         आतली माहिती भयंकर आहे. कुठल्या समाजात आपण राहत आहोत? असा प्रश्न पडतो. ज्या गावात हे  वासनाकांड झाले तो भाग  ग्रामीण आहे.  अलीकडे  मोबाईल, सिनेमा ह्यामुळे लहान वयातच मुलामुलींच्या वासना  चाळवल्या जात आहेत. त्यात चुकीची सांगत असेल तर बोलायला नको. ही  मुलगी दहावीत असतानाच एका युवकासोबत मैत्री झाली होती.  भेटी वाढत गेल्या.  घरी कुणी नसताना दोघे शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते.  चार महिने झाल्यानंतर मुलीला उलट्या व्हायला लागल्या आणि पोट दुखायला लागल्याने आईच्या लक्षात हा प्रकार आला.  आईच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या युवकाचे नाव सांगण्यासाठी मुलीची पोलीस विचारपूस करीत आहेत. त्याचे नाव कळेलही.  पण पुढे काय? शिकायच्या वयात ही पिढी काय शिकते आहे? तारुण्याचे हे दिवस  निघून जातील.  पण पुढे काय? कोण जवळ करणार?

               पूर्वी समाजाचा धाक होता. शिक्षक मुलांवर संस्कार करायचे. आता शिक्षकही त्या भानगडीत पडत नाहीत. शेजारच्या घरावर शेजाऱ्याचे  लक्ष असायचे. अलीकडे  कोणाला वेळ आहे कुठे? त्यामुळे मुलं-मुली  बेफाम धावत सुटल्या आहेत.  शेतमजुराची मुलगी वाहवत गेली.  सुशिक्षितांच्या मुलं-मुली तर हवेत असतात. हिरोहिरोईन त्यांचे आदर्श बनले आहेत.  समाज अधोगतीला लागला आहे.  सारेच बुडतो म्हणताहेत. कोण  कुणाला वाचवणार?

 311 Total Likes and Views

0 Comments

No Comment.