रिलायन्स समुहाचे सुप्रीमो मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. जीओचं फाइव्ह जी नेटवर्क अंबानी येत्या दिवाळीत सुरु करीत आहेत. हे जगातील सर्वात मोठं फाइव्ह जी नेटवर्क असेल असं अंबानी म्हणाले. पहिल्या टप्प्यात सुरुवातीला केवळ चार शहरांमध्ये ही सेवा सुरु केली जाईल. येत्या दिवाळीच्या सुमाराला दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्यामध्ये ही सेवा पुरवली जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत फाइव्ह जीची सेवा अनेक छोटी शहरं, तालुके आणि गावांमध्येही पोहचेल.
५ जी सेवा म्हणजे मोठी क्रांती राहणार आहे. ह्या सेवेचा वेग १ gbps असेल. सोप्या शब्दात सांगायचे तर ४ जीच्या मुकाबल्यात ही स्पीड शंभर पट आहे. तुमच्या सध्याच्या मोबाईलमध्ये ४जी असेल. त्या फोनमध्ये ५ जी नेटवर्क काम करणार नाही. तुम्हाला ५ जी सेवा हवी असेल तर सध्याचा फोन चालणार नाही. जिओचा ५ जी फोन घ्यावा लागेल.
रिलायन्स कंपनीने परवडणारे 5G स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा देखील केली आहे. हा फोन स्वस्त असेल असे रिलायन्स सांगत आहे. पण स्वस्त म्हणजे १२ ते १५ हजार रुपयाला हा फोन असेल. पण पैशाकडे का पाहता? तुम्हाला सुविधा किती मिळताहेत. खास म्हणजे वेग. दुसरे म्हणजे कव्हरेज आणि रेंज. तुम्ही रेल्वे किंवा बस, कुठेही असा, वापरू शकता. आता महत्वाचं म्हणजे किती खर्च येईल? सुरुवातीला तरी ४ जीच्या भावातच स्कीम चालेल असे दिसते. प्रश्न पैशाचा नाही. कनेक्टीव्हिटीचा आहे. झटपट संपर्क होणार असेल तर अनेक क्षेत्रात क्रांती होणार आहे. जग तसेच लहान झाले आहे. ते आणखी लहान होणार आहे.
255 Total Likes and Views