पुन्हा शरद पवार आणि बारामती यांचे महत्त्व देशात अधोरेखित करण्याचे पुण्य काम भाजपाचे नेते करत आहेत.
पवारांच्या घराण्याची धुळधाण करणार, – अशा वल्गना काही भुरटे चोर आमदार करत आहेत.
ज्या आमदाराने फडणवीस यांच्या समोर मंगळसूत्र चोरल्याची आणि पार्टीतील नेत्याचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली, त्यांना फडणवीस यांनी बक्षीस म्हणून आमदार केले! आणि म्हणे फडणवीस खूप हुशार आणि दुरद्रृष्टीचे आहेत. असो…!
*बारामती जिंकणार म्हणजे नेमकं काय करणार?*
येथील कृषी विज्ञान प्रतिष्ठान पेक्षा मोठी संस्था निर्माण करणार?
इथल्या औद्योगिक वसाहतीपेक्षा मोठी वसाहत निर्माण करणार?
इथल्या सहकारी संस्थांपेक्षा मोठ्या संख्येने संस्था निर्माण करणार?
इथल्या विद्यानगरीमध्ये देशातील मुलं शिकायला येतात, मग यापेक्षा मोठी संस्था निर्माण करणार?
इथलं रेल्वे स्टेशन मोठं करणार?
इथल्या पंचायत समिती आणि प्रशासकीय इमारतीच्या भव्यता लुप्त करून नव्या इमारती उभ्या करणार का?
इथली कुरकुंभ एम आय डी सी, इंदापूर पंचतारांकित एमआयडीसी यांच्या पेक्षा मोठे कारखाने आणणार का?
की हिंजवडी येथील देशातील पहिला आयटी पार्कला पर्याय म्हणून नवा भव्य दिव्य आयटी पार्क उभा करणार?
*इथला शेतकरी स्वयंपुर्ण आहे,…. त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी तुमच्याकडे नियोजन काय आहे?*
अजून बरेच काही आहे पण हे सर्व उभं करायला शरद पवार या माणसाला वयाची ब्याऐंशी वर्षे खर्ची घालावी लागली आहेत.
त्यांची तिसरी पिढी रात्रंदिवस या संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, – यासाठी खडा पहारा देत आहेत.
येथील प्रत्येक संस्था आदर्शरित्या चालविल्या जात आहेत.
देश आणि परदेशातील कृषी तज्ञ, शेतकरी दररोज भेट देतात, अभ्यास करतात.
इथली उत्पादनं संपूर्ण महाराष्ट्रात आहेत.
*भाजपाच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही शरद पवार यांचा पराभव करायला निघालात ना तर मग शरद पवार यांनी जे काम उभे केले आहे, त्यापेक्षा मोठी कामे करुन दाखवा.!*
ज्या कामाचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, शरद पवार यांचं कौतुक केलं आहे, त्याच पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पराभवाची स्वप्नं पहात आहेत.
अगदी दोन दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत चालू राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. *त्यांनी सुध्दा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.*
लक्षात ठेवा, …
*निसर्गाचा एक नियम आहे. जे लवकर आणि जोमाने वाढते त्याचा शेवटही लवकरच होतो.!*
२०१४ ते २०१९ हा काळ भाजपासाठी pick point होता,
२०१९ ते २०२४ हा stable point आहे आणि
२०२४ नंतर ओहोटीचा काळ असु असेल!
*समुद्राला भरती ज्या गतीने येते त्यापेक्षा ओहोटीची गती जास्त असते!*
त्याची सुरुवात गुजरात मधून होईल. कारण जिथुन वर्तुळ सुरू होते तिथेच येऊन ते थांबते.
*याची पुरती जाणीव भाजपाच्या नेत्यांना झाली आहे म्हणून ते सर्व यंत्रणांचा बेमालूमपणे वापर करत आहे.*
यातूनही त्यांना यश येईल असे वाटत नाही.!
मग प्रश्न उरतो तो हा की शरद पवार यांना लक्ष्य का केले जाते.!
त्याचे एकमेव कारण आहे की शरद पवार हा एकमेव नेता असा आहे की सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतात.
मग शरद पवार यांनाच लक्ष्य करुन महाराष्ट्र आणि बारामती मध्ये जखडून टाकायचं! यापेक्षा फार महत्त्व नाही.
जर भाजपा आणि त्यांचे नेते असेच वागत राहिले, बरळत राहिले तर तेच त्यांचे खड्डे खणत आहेत, – हे मात्र नक्की आहे!
देशाने अनेक राजकीय उलथापालथी बघितल्या आहेत, *इंदिरा गांधी यांच्या सारख्या बलाढ्य नेतृत्वाला राजनारायण सारख्या सामान्य माणसाने पराभूत केले होते,* ….. तिथं मोदी यांनी तर त्याहून मोठ्या चुका केल्या आहेत.!
जे काही वाचाळवीर म्हणत आहेत की श्रीलंकेतील नेत्यांप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल, तर त्यांचा अभ्यास खूपच कच्चा आहे.!
भारत हे संघराज्य आहे, प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती आणि रहाणीमान वेगवेगळे आहे म्हणून जनता एकत्र यायला उशीर होतो, परंतु लक्षात ठेवा…
जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व जनतेने निर्माण केले होते.
कोणताही पर्याय नाही, – हा भ्रम इंदिरा गांधी यांचाही होता. जसे इंदिरा गांधी यांना वाटत होते, ‘मला कोणीच पर्याय नाही’, तेव्हा जनता पर्याय उपलब्ध करते, हे लक्षात घेतले पाहिजे.!
शरद पवार यांच्या पार्टीचे खासदार किती? साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष , – अशीही हेटाळणी केली जाते.
*मग, ….हा जर एवढा छोटा पक्ष आहे, तर देशाच्या पंतप्रधान यांच्यापासून ग्रृहमंत्री, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षा पर्यंत सगळे कामाला का लागले आहेत.?*
पाच सहा खासदार आहेत, ठिक आहे, संख्या कमी आहे, हे कबूल पण त्यापैकी तीन संसदरत्न आहेत.
*मुर्खांच्या गर्दीपेक्षा शहाण्यांची संख्या कमी असली तरी हरकत काय आहे?*
म्हणून बारामती मतदारसंघ शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई सुळे, आप्पासाहेब पवार यांनी एखादी सुंदर मुर्ती शिल्पकाराने तयार करावी तशी केली आहे, या अप्रतिम कामाला दृष्ट लावण्यासाठी काही अतृप्त आत्मे तळमळत आहेत, – त्यांना बारामतीकर स्थान देणार नाहीत.!
.
161 Total Likes and Views