पितरांचे साठी कावळा घास किंवा नैवेद्य का ठेवतात???

Analysis
Spread the love

.शंकराचार्य .        एका साधकाने महापेरीयव यांना (म्हणजे श्री आदिशंकराचार्यांना) विचारले, महालयाच्या दिवशी आपण कावळ्यांकरता जेवणाचे ताट का वाढून बाहेर ठेवतो?  आपले पूर्वज काय, अति नीच व घाणेरड्या अशा कावळ्यांच्या रुपात येतात? एखाद्या उच्च समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या रुपात का येत नाहीत?
शंकराचार्य मंद स्मित करत म्हणाले, तमिळ मध्ये कवळ्याला आपण काऽकाऽ म्हणतो. संस्कृत मधेही काक म्हणतो. आपण इतर कुठल्या पक्षाचे नाव त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून देतो का? कुणी पोपटाला किंकिं किंवा मोराला म्यांव-म्यांव असे म्हणतात का? नाही. कावाळ्यालाच त्याच्या आवाजावरून नाव पडलंय कारण खरच कावळा हा एक विशेष (special) पक्षी आहे. (तमिळमध्ये) ‘का’ चा अर्थ कापथू म्हणजे ‘माझे रक्षण कर’ असा आहे. म्हणून जेव्हा आपण कावळ्याला अन्न ठेवतो व का का असे म्हणतो, तेव्हा आपण खरे म्हणजे, आपल्या पूर्वजांना आपले रक्षण करण्याचे आवाहन करत असतो.
तुम्ही कावळ्याला नीच जातीचा समजता कारण तो वाट्टेल ते घाणेरडे सुद्धा खातो, व आपल्या आजूबाजूला सहज आढळतो. पण लक्षात घ्या की तो एक सुंदर, चांगला व उपयुक्त पक्षी आहे. अहो तो आपल्याला त्याच्या कावकाव ह्या ओरडण्याने ब्राह्म मुहूर्तावर झोपेतून जागे करतो. कोंबडा पहाटे आरवतो व आपल्याला उठवतो असे म्हटले जाते. ते काही अंशी खरेही आहे. पण कोंबडे हे लहरी (मुडी) असतात.  ते वेळेवर उठवतीलच असे नाही. पण कावळा मात्र तुम्हाला ब्राह्म मुहूर्तावर, अर्थात जपाकरता सर्वात उत्तम असलेल्या वेळेवर उठवणार म्हणजे उठवणार. आपली योग्य वेळी पूजा-अर्चा व्हावी म्हणून तो आपल्याला जणू मार्गदर्शन करतो.
आणि एक !  त्याला थोडे अन्न मिळाले की तो ओरडून आपल्या बांधवांनाही बोलावतो. इतर प्राण्यात हा गुण आढळत नाही. खरच, माणसांनी सुद्धा हे कावळ्याकडून शिकलं पाहिजे. केवळ म्हणी पुरतं “एक तीळ सात जणांनी वाटून खावा” असे म्हणून काय उपयोग?
संध्याकाळी सुद्धा कावळा काऽकाऽ करत आपल्या घरट्यात परततो. झोपण्यापूर्वी तो जणू देवाला सांगतो की दिवसभरात जे काही घडलं त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. आणि तुम्हाला हे माहित आहे का की कावळा सूर्यास्तानंतर काहीही खात नाही? आपल्या शास्त्रात सुद्धा सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे वर्ज आहे.  आता किती जण हे शास्त्रवचन पाळतात नकळे. असो. त्यामुळे मला, कावळा हा एक नीच पक्षी आहे, असे मुळीच वाटत नाही. बघा, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींप्रमाणे, तो आपल्याला काय काय शिकवतो. म्हणून आपले पितर कावळ्याच्या रुपात येणे पसंत करतात.
आणि एक महत्वाचं. तुम्ही कावाळ्याकरता रोज थोडं अन्न ठेवत जा, केवळ महालय असेल तेव्हाच असे नको.
आणि हो! कावळा आपल्याला अद्वैत ज्ञान सुद्धा देतो. तुम्ही ठेवलेले अन्न दिसल्या बरोबर तो खूष होतो व आनंदाने ते अन्न खातो. त्याला खातांना बघून तुम्हीही आनंदी होता. म्हणजे तुम्ही दोघेही आनंदी होता. कारण तुम्ही दोघेही भगवान आहात.
तुम्हाला काय वाटतं, आपले ऋषी-मुनी वेडे होते?
आपल्या पुर्वाजांपर्यंत, आपल्या पितरांपर्यंत अन्न पोचावं म्हणून त्यांनी कावळ्यांना अन्न घालण्याची प्रथा का पाडली असेल? त्यामागे आपल्या साधुसंतांचा एक अतिशय कुशल व विशेष विचार आहे. 
आता ऐका ते खरं कारण. 
तुम्ही कधी वडाचं किंवा पिंपळाच झाड लावलय का? आणि कोणाला लावतांना कधी बघितलय का? त्यांच्या बिया मिळतात का हो? नाही ना !
फांद्या लावून पण ही झाडे जगत नाहीत. निसर्गाने यांच्याकरता एक अजब व्यवस्था निर्माण केली आहे. कावळे ह्या झाडांची बियांसकट फळे खातात. ती पचतांना, त्या बियांवर, काही विशिष्ठ प्रक्रिया घडतात. नंतर कावळ्याच्या विष्टेवाटे जिथे ह्या बिया पडतात, तिथेच ही झाडे उगवू शकतात.
पिंपळ हे असे एक झाड आहे की जे चौवीस तास प्राणवायू देते, आणि वड तर एक उत्तम औषधी वृक्ष आहे. हे दोन्ही वृक्ष जर नामशेष होऊ नयेत असे वाटत असेल तर कावळ्यांशिवाय पर्याय नाही.
पितृ पंधरवडा हा कावळ्यांच्या विणीचा हंगाम असतो. कावळ्यांची चांगली, सुद्रुढ नवी पिढी निर्माण होण्याकरता ह्या जुन्या पिढीला, ह्या काळात चांगले पोषक अन्न मिळाले पाहिजे. म्हणून आपल्या पूर्वजांनी हा एक कर्मकांडाचा भाग करून ठेवला आहे.
जेव्हा तुमच्या नजरेस, वड, पिंपळ किंवा कावळा दिसेल तेव्हा आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीची व चांगल्या हेतूची आठवण होऊदे…

 452 Total Likes and Views

0 Comments

No Comment.