सीट बेल्ट बांधला असता तर मिस्त्री वाचले असते

News
Spread the love

देशाचे  मोठे  उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने  काही प्रश्न ऐरणीवर आले आहेत.  मिस्त्री ज्या कारमधून  बसले होते ती कार ७० लाख रुपयाची होती, मर्सिडीज होती. अपघात झाला तर  सुरक्षिततेचे सारे उपाय तिच्यात होते. मग काय घोटाळा झाला?  मिस्त्री यांची भरधाव कार  रस्ता दुभाजकावर धडकली आणि  मिस्त्री जागीच गेले. अपघात झाला तर ७० लाखाची कारही तुम्हला वाचवू शकणार नाही असे मानायचे का? जीवाच्या भीतीने महागडी कार घेणारे ह्या अपघाताने  घाबरले आहेत.

            अह्मादाबाडहून मुंबईकडे येताना  मिस्त्री यांचा रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात मृत्यू झाला.  चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलावर  कठड्याला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला. स्त्री रोग तज्ञ  डॉ. अनायता पंडोल गाडी चालवत होती. ती आणि तिचा नवरा दरीयस पंडोल  हे गंभीर जखमी झाले. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळेच  त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कार पुलाच्या कठड्याला धडकताच मोटारीतील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या, मात्र दोघे बाहेर फेकले गेल्याने त्यांचे  संरक्षण होऊ शकले नाही. मागील सीटवर बसल्यानंतर सीट बेल्ट न बांधण्याची चूक जीवावर बेतली.  दुसरे महत्वाचे म्हणजे, गाडी पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती.  गाडीच्या वेगाचा अंदाज चालकाला आला नाही.

               ह्या अपघातापासून काही शिकायचे असेल तर  गाडीत बसताना सीत बेल्ट बंध. हे मस्ट आहे.  तसा कायदा आहे.  आपल्याकडे  समोरच्या बाजूचे दोघे सीत बेल्ट लावायचे कष्ट घेतात. तेही  पोलीस दंड करतील ह्या भीतीने. पण जीवाच्या भीतीचे काय?   गेल्या वर्षी  देशभरात ४ लाख  रस्ते अपघात झाले. आणि या अपघातांमध्ये   दीड लाख लोक मेले.  म्हणजे दर तासाला १८ लोक मेले. ह्या वर्षी तर हे प्रमाण आणखी वाढेल. कारण अपघात वाढले आहेत.  तेव्हा मानवांनो, जीवाला सांभाळा. सीत बेल्ट बंध.  कंट्रोलमध्ये राहील एवढ्याच वेगाने  गाडी चालवा. कारण ‘जिंदगी, ने मिलेगी दोबारा.’

 152 Total Likes and Views

0 Comments

No Comment.