सलमान खानला त्याच्या फार्म हाउसजवळ उडवणार होते

Editorial Entertainment
Spread the love

दबंग  सुपरस्टार ५६ वर्षे वयाच्या  सलमान खानवर बिश्नोई टोळीने  दुसऱ्यांदा हल्ला करण्याचा कट रचला होता. पण जमले नाही.  पंजाब पोलिसांच्या तपासात  ही धक्कादायक माहिती उजेडात आली. सलमाननं राजस्थानमधल्या जोधपूर इथे काळ्या हरिणाची शिकार केली, असा त्याच्यावर आरोप आहे. १९९८ चे हे प्रकरण आहे. काळं हरीण बिश्नोई समाजासाठी पवित्र मानलं जातं. म्हणून तो सलमानच्या जीवावर  उठला आहे.  सिद्धू मूसेवाला खून प्रकरणापूर्वीही  लॉरेन्स बिश्नोईने हल्ल्याचा कट रचला होता. चार वर्षापूर्वी बिष्णोईने तशी तयारी केली होती. 

           पनवेलमध्ये  सलमानचे फार्म हाऊस आहे. ह्या  फार्म हाऊसच्या रस्त्यावरच लॉरेन्स बिश्नोईच्या शूटर्सनी  खोली भाड्याने घेतली आणि जवळपास दीड महिना तिथे राहिले होते.  हिट अँड रन प्रकरणात  नाव आल्यापासून सलमानची गाडी नेहमीच हळू  चालते हे शूटर्सना माहीत होते.  शूटर्सनी ज्या रस्त्यावरून सलमान पनवेलच्या फार्म हाऊसवर जातो त्या रस्त्याचाही माग काढला होता. या रेकीदरम्यान दोनदा सलमान फार्महाऊसवर गेला होता, पण लॉरेन्स बिश्नोईच्या नेमबाजांचा हल्ला चुकला होता.

            सलमान खानला ठार मारण्याच्या धमक्या अनेक वेळा आल्यात. काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खाननाही धमकीचं पत्र मिळालं होतं. मूसेवाला हत्येनंतर आलेल्या धमक्यांमुळे  सलमान खानची जास्त काळजी घेण्यात येत आहे. पोलिसांना हे कळलं होतं की, बिश्नोईने  सलमानला मारण्याची सुपारी दिली होती आणि तो शूटर मुंबईत पोहोचला होता.

       अशी माहिती मिळाली की,  सलमाननं त्याची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तो आता पांढऱ्या रंगाच्या बुलेटफ्रूफ कारमधून फिरतो. ही लँड क्रूझर आहे. त्याच्याबरोबर शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांचा ताफाही असतो. याआधी तो लँड रोवरमधून फिरायचा.

 137 Total Likes and Views

0 Comments

No Comment.