भारतात तब्बल ७० वर्षांनंतर ‘चित्ते’ दिसणार आहे. आफ्रिकन देश नामिबियामधून ८ चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. हे चित्ते आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी हे विशेष विमान मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये उतरले. त्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आले आहे.
हे चित्ते मध्य प्रदेशातील श्योपुर येथे पोहोचले आहेत. काही वेळाने पंतप्रधान मोदी त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडतील. या ८ चित्त्यांमध्ये ५ मादी आणि ३ नर चित्ते आहेत. तर ३ नर चित्यांमध्ये २ सख्खे भाऊ आहेत. तर चित्ता ब्रदर्सचं वय साडे पाच वर्ष आहे. तिसऱ्या नर चित्याचं वय साडे चार वर्ष आहे. तसेच ५ मादी चित्त्यांचं वय २ वर्षे ते ५ वर्षांपर्यंत आहे. या चित्त्यांचे आयुष्य जास्तीत जास्त १२ वर्षे असते, अशी माहिती देण्यात आली आहे.
१९५२ मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित केल्यानंतर सात दशकांनंतर भारतामध्ये त्यांच्या पुन: परिचयासाठी दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले गेले आहेत. भारतातून नामशेष झालेली ही प्रजाती पुन्हा देशात आल्यामुळे सध्या सर्वत्र आणि विशेष म्हणजे प्राणीप्रेमींना आनंद झाला आहे.
143 Total Likes and Views