आज प्रत्येक माणसाच्या हातात तुम्हाला स्मार्टफोन दिसतो. मोबाईल हाती नसलेला माणूस दुर्मिळ झाला आहे. मोबाईल हरवला तर स्वतःचा मुलगा हरवल्यासारखा माणूस अस्वस्थ होतो. मोबाईल सांभाळण्याचे टेन्शन अनेकांना आहे. पण अशा लोकांसाठी मोठी बातमी आहे. जग बदलत आहे. स्मार्टफोनची टेक्नोलॉजी वेगाने बदलत आहे. भविष्यात स्मार्टफोन इतके हायटेक होतील की ते कुणाच्या हातात मोबाइल दिसणार नाही.चक्क शरीरात चीप म्हणून फिट केले जातील. येत्या आठ वर्षाच्या आत हा बदल तुम्हाला दिसेल.
मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स ह्या कामात भिडले आहेत. त्यांच्या मते, इलेक्ट्रॉनिक टॅटूने स्मार्टफोनला बदलले जावू शकते. म्हणजेच भविष्यात स्मार्टफोनच्या जागी एक इलेक्ट्रॉनिक टॅटूला वापरले जावू शकते. बिल म्हणतात, लवकरच तुम्ही पाहाल. स्मार्टफोन कुणीच खिशात वापरणार नाही. कुणाच्या हातातसुद्धा स्मार्टफोन दिसणार नाहीत. तर स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूजच्या रुपात बदलले जाईल. हे इलेक्ट्रॉनिक टॅटू एक छोटी साइजची चिप असेल. ज्याला व्यक्तीच्या शरीरात फिट केले जाईल.
नोकियाचा बॉसही हेच म्हणतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनच्या जागी स्मार्ट ग्लास किंवा याच प्रकारचे अन्य दुसरे डिव्हाइसचा वापर केला जाईल. २०३० पर्यंत स्मार्टफोनसंबंधित खूप साऱ्या गोष्टी शरीरात थेट इंटिग्रेट केल्या जातील.
स्मार्टफोन बनवणाऱ्या ह्या कंपन्या हे नवे तंत्रद्यान आणतील तेव्हा आणतील तेव्हा आणतील. पण काय गंमत आहे नाही? सध्याही स्मार्टफोन काय कमी छुपा रुस्तुम आहे?
498 Total Likes and Views