मुलींच्या वसतिगृहात मुली सुरक्षित असतात असा समज आहे. पण ते काही खरे नाही. कलियुग सुरु आहे. पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ लीक झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हे व्हिडिओ लीक केल्याचे बाहेर आल्याने सस्पेन्स वाढला आहे. या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाची दखल पंजाब महिला आयोगानंही घेतली आहे.
चंदीगड विद्यापीठानं याप्रकरणी मोठा खुलासा केलाय. एका मुलीनं शूट केलेला वैयक्तिक व्हिडिओ वगळता कोणत्याही विद्यार्थ्याचे कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत, जे आक्षेपार्ह आहेत जे तिनं तिच्या प्रियकरासह शेअर केले होते, असंही विद्यापीठानं म्हटलंय.ह्या मुलीने ज्याला व्हिडीओ पाठवला त्या शिमल्यातल्या तरुणाला पोलिसांनी उचलले आहे.
२४ तास होऊनही नेमके काय झालय ते कळत नसल्याने संशयकल्लोळ वाढला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे व्हिडिओ एका विद्यार्थिनीनं शूट केलं होतं आणि नंतर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
एखादी पोरगी असे कसे करू शकते? करीत असेल तर टी विकृत असेल. नेमका मामला काय? काहीही झालेले नाही तर मग एवढ्या मुली दोन दिवसापासून रस्त्यावर का आंदोलन करीत आहेत? नेमका काय मामला आहे? काँग्रेस नेते म्हणाले, ट्विटर-ट्विटर खेळण्याची ही वेळ नाही. हा विषय विद्यार्थ्यांशी निगडित आणि अत्यंत गंभीर बाब आहे. एकीकडे उच्चस्तरीय चौकशीची चर्चा आहे तर दुसरीकडे विद्यापीठाचे प्रो-व्हाइस चान्सलर काहीही झाले नसल्याचे सांगत आहेत. ही चौकशी अशी कशी होईल?
128 Total Likes and Views