शेवटी पंतप्रधान कुणीही असो ‘अच्छे दिन’ तोपर्यंत आणू शकत नाही, जो पर्यंत जनता साथ देत नाही ..!!

News
Spread the love

रोज या वर्तमानपत्रांना फक्त राज ठाकरे, उद्धव ठाकरे, भुजबळ, पवार, फडणवीस हेच कां दिसतात ..?
यांना नवीन होणारे प्रकल्प कां दिसत नाहीत ..? यांना, देशात नवीन पिढी चमत्कार घडवते आहे, हे कां छापता येत नाही ..?

किती जणांना माहित आहे ओयो / हाईक या नव्या अॅप्स बद्दल ..?
ओयो बनवणारा फक्त २३ वर्षांचा कोवळा मुलगा आहे आणि एकहाती त्याने ६०० कोटींचा व्यवसाय सुरु केला आहे .. तेही कुठल्याही मदतीशिवाय ..!! पण आमच्या वर्तमानपत्रांना हे दिसत नाही ..
रेडबस ही ७०० कोटींची अॅप्स बनवणारे तिघे फणींद्र साम, सुधाकर पुसूंपुनेरी, चरण पद्मराजू हे हैद्राबादचे, पण कोणालाच माहित नाही.
पी. सिंधु चीनमध्ये जाऊन चिनी जमिनीवर, त्यांच्याच, जगातल्या क्रमवारीतील क्रमांक १ ला हरवून आली ..!! पण कोणीही छापत नाही.
ह्यांना फक्त तेंडुलकरच दिसतो ..!! मग बाकीचे कुचकामी कां ..?

कारण देशाभिमान वाटावा, अशी कुठलीही गोष्ट छापणे हे यांच्या नीती विरुद्ध आहे. या गोष्टी अजिबात छापून येत नाहीत, असे नाही. कुठल्याश्या कोपऱ्यात अगदी जुजबी माहिती देऊन, उपकार केल्यासारखे छापतात .. याच वर्तमानपत्रांनी जरा या अति श्रीमंत नेत्यांच्या प्राप्तिकर स्टेटमेंटस् बद्दल छापून दाखवावे .. मग मानतो की त्यांना ..! ही असते असली पत्रकारिता, झाकलेल्या मुठी उघडण्याची आणि सत्य जगासमोर आणण्याची ..
परंतु, इमान विकलेल्या पत्रकारांकडून काय अपेक्षा ठेवावी आणि कशी ठेवावी ..?

परवाच ‘दि हिंदू’ मध्ये भली मोठी हेडलाईन होती,
”विमुद्रीकरण आणि वस्तु व सेवाकर प्रणालीमुळे देशात दुर्दशा आली ..!!” – इति राहुल गांधी .. प्रचंड मोठी हेडलाईन ..
मला सांगा की राहुल गांधी कांही कोणी अर्थशास्त्राचा प्रकांड पंडित नव्हे .. मग त्याला महत्व कां द्यायचे? बरं तो बरळला असेल कांहीतरी म्हणून देशातल्या सर्व वर्तमानपत्रांनी त्याला हेडलाईन कां बनवावे ..? केवळ तो काँग्रेसचा नेता म्हणून ..?
काँग्रेसमध्ये शिकलेला सवरलेला कोणी लाल बहाद्दूर शास्त्री राहिला नाही कां ..? फक्त गांधी परिवाराचं राहिला आहे ..?
कितीजणांना माहित आहे वस्तु व सेवाकर प्रणाली ही १५८ देशात यशस्वी करप्रणाली आहे आणि म्हणूनच ती भारतात आणली गेली ..
वस्तु व सेवाकर प्रणालीच्या अंलबजावणीसाठी काँग्रेसची देखील मंजुरी घ्यावी लागली होती.
मोदींनी सोनिया आणि इतर काँगेसजन यांच्या बरोबर बैठक घेतली होती. कारण लोकशाहीत ८०% मते आवश्यक असतात असल्या मोठ्या निर्णयाला ..!!

दुसरे, रिचर्ड थेलर माहित आहे कां कोणाला ..? बहुधा नाही .. विमुद्रीकरणाचा मूळ जनक ज्याला आज नोबेल मिळाले,
त्याने मोदींना १०० गुण दिले, विमुद्रीकरणाबद्दल ..!

”This is a Policy I have long supported. First step toward Cashless and Good Start on Reducing Corruption ..”

आता त्याचा या गुणांशी कुठलाही स्वार्थ, संबंध नव्हता. पण त्याच्याबद्दल लिहिणे म्हणजे महापाप ..!! विद्वान असला तरी काय झाले ..?
मोदींच्या निर्णयाला योग्य निर्णय म्हणतोय, म्हणजे मूर्खच ..! असेल मोठा अर्थतज्ज्ञ तिकडचा ..!!

युरोपियन समुदाय एखादी गोष्ट पटली की लगेच अंमलात आणतो. उदाहरणार्थ, योगासनें ..!! आज युरोप आणि अमेरिकेत योगासनें जास्त केली जातात. मग ते तिथे धर्म किंवा देश बघत नाहीत. या एकमेव गोष्टीत मला ते आपल्या पुढचे वाटतात. रिचर्ड थेलरचं ऐकून, त्यांनीही रोखीविना चलनाची अंमलबजावणी सुरु केली आहे. मग आपणच मागे कां बरे राहावे? जवळ-जवळ १० वर्षात सगळे पुढारलेले देश कॅशलेस होतील ..!!

एक काळ असा होता की, लोक बोलतांना वर्तमानपत्रांचा दाखला द्यायचे की बघ पेपरमध्ये छापून आलंय ..!!
आताशा अशी वेळ अली आहे की मी गेली ७ वर्षे वर्तमानपत्रच घेणं बंद केलं आहे. ऑफिसमध्ये फक्त वरच्या बातम्या एकदा वाचतो आणि योग्य तो अर्थ लावायचा प्रयत्न करतो.
बाकीचे ज्ञान व्हाट्सअॅपवर फुकट मिळते ..!

चीन बद्दल थोडं!
अफाट महत्वाकांक्षा तीही एवढी अफाट, की माणसं मेली तरी चालेल पण पैसा प्रचंड वाढला पाहिजे .. भारतापेक्षा जास्त लोकं या देशात आत्महत्या करतात खास करून फॅक्टरी कामगार. कारण रोज १२ तास काम ६ दिवस आणि ७ व्या दिवशी काम केलं तर दुप्पट पगार.

कामगारांचे घर फॅक्टरीच्याच आंतमध्ये म्हणजे येण्या-जाण्याचा वेळ आणि खर्चही वाचला .. फॅक्टरीच्या बाहेर जीवन नाहीच.
थोडक्यात गुलामीच, पण नवीन प्रकारची .. लोकशाही तर यांना माहित पण नाही ..

चीन आज जगात ६४ देशांना ‘वन बेल्ट वन रोड (ओबोर)’ या प्रोजेक्टने जोडतो. या सर्व देशांत रस्ते, रेल्वे आणि वीज बनवण्याची तजवीज चीन करणार .. त्यासाठी आवश्यक ती टेक्नॉलॉजी आणि सामुग्री चीन देणार .. युगांडा, कांगो, रवांडा, बुरुंडी, सुदान, इथिओपिया मध्ये तर रस्ता पण नाही .. तिथे चक्क रेल्वे येणार. दिसायला किती विलोभनीय दिसतंय आणि असं वाटतंय की चीन या देशांची किती मदत करतोय ..!
पण यासाठी कर्ज देणारी चीनची ‘चायना डेव्हलपमेंट बँक’ ही ८% व्याज लावतेय.
अगदी ‘वर्ल्ड बँक’ सुद्धा जास्तीस्त जास्त फक्त ३% दराने व्याज देते ..
जर देश गरीब असेल तर १% ने ..
आज हे देश न विचार करता, कर्ज घेत आहेत. यांच्यातलाच एक देश आहे पाकिस्तान ..! जवळ-जवळ ७० बिलियन डॉलरचा ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’ प्रोजेक्ट .. सुरवातीला पाकिस्तानात सर्व वर्तमानपत्र आणि अर्थतज्ञ फक्त अत्यानंदाने नाचायचेच बाकी होते. हा प्रोजेक्ट संपेल सन २०३० साली .. चीनने यासाठी लावला व्याजदर ८% ..!!
जेंव्हा त्यांना कळले की खरा जागतिक व्याजदर फक्त ३% असतो .. त्यांना मग फेफरे यायचेच बाकी राहिले ..!
सरकारने ही गोष्ट लोकांपासून लपवून ठेवली आणि आता ते निर्णयावरून माघारी जाऊ शकत नाहीत ..

दुसरं, पाकिस्तानात सुद्धा मेट्रो ट्रेन आहे .. इस्लामाबादमध्ये २४ किलोमीटरची, अर्थात चीनने बनवलेली ..!
फक्त एवढंच की त्या ट्रेनच्या सात पट पैसे देऊन पण पाकिस्तान कर्ज मुक्त झालेले नाही ..! जे कोणी उत्सुक असतील त्यांनी विकीपेडिया वर ही लिंक वाचावी ..

👇
https://en.wikipedia.org/wiki/Rawalpindi-Islamabad_Metrobus

एवढे प्रचंड अव्वाच्या सव्वा भाव जगात कोणी लावले नसतील. तरी बरं आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे .. चीनने असेच कर्ज द्यावे आणि पाकिस्तान कर्जात कायमचा बुडावा.
’सुंठीवाचून खोकला जाणे’ बोलतात ते हेच ..

आज जपान आपल्याला फक्त ०.१% दराने कर्ज आणि टेक्नॉलॉजी दोन्ही देऊन गेला, ही गोष्ट त्यांना अतिशय झोंबली आहे ..! मी भारताच्या बातम्या नित्य नियमित पाकिस्तानी न्यूज चॅनलवर बघत असतो. युट्युब वर फुकट आहे सगळं ..!! माझा देशाभिमान खऱ्या अर्थाने तिथे जागृत होतो. एक वेगळी मौज असते, जेंव्हा शत्रुराष्ट्र तुमच्या देशाच्या प्रगतीबद्दल तिरीमिरीने बोलत असते. सहज म्हणून जाउन बघा युट्युब वर .. एक काळ असा होता की आपला संघ नित्य नियमित हरत असे. सन १९९०-९९ साल आठवा, आपण म्हणायचो की वसीम अक्रम सारखा बॉलर नाही आपल्या क्रिकेट टीममध्ये.
आज पाकिस्तान अगदी तसेच बोलताना दिसतो .. मोदींसारखा पंतप्रधान नाही त्यांच्याकडे ..!!

थोडक्यात चीन हा सर्व आफ्रिकी देशांना प्रचंड कर्ज देत सुटलाय आणि त्याची परतफेड करायची कशी ते पण या देशांना माहित नाही ..! जिथे बँका नाहीत, कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर नाही तिथे कसे आणि काय कर्जफेड करणार हे लोक ..?

१० वर्षांत अशी वेळ येईल की, या सर्व देशांना चीनला देण्यसासाठी पैसेच नसतील ..!! उदाहरणार्थ, श्रीलंकेत चीनने एक मोठा हंबनटोटा नावाचे पोर्ट बनवले .. ३६१ मिलियन डॉलर्सचे .. केवळ व्यापारी उद्देशासाठी, आणि कांहीं कालावधीने, चीनने त्यांच्या वॉरशिप्स उभ्या केल्या ..
भारताने आक्षेप घेतला आणि श्रीलंकेला शेवटी चीनला आदेश द्यावे लागले की या वॉरशिप्स तुम्ही इथे ठेवू शकत नाही ..!!
आज श्रीलंकेकडे या पोर्टचे कर्ज चुकवायला पैसे नाहीत आणि ते भारताला सांगत आहेत की तुम्ही हा पोर्ट विकत घ्या. बोला, आता काय करायचे ..?

’न्यू एज ऑफ इंपिरियॅलिजम’ म्हणजेच, एका नवीन प्रकारचा वसाहतवाद ..!! आधी जे ब्रिटिश करत होते तेच, पण आता अव्वाच्या सव्वा दराने कर्ज देऊन कायमचे वेठबिगारी बनवणे, हे चीनचे नवीन धोरण आहे आणि त्यांच्या जमिनींवर आणि खाणींवर कब्जा मिळविणे ..!!

आपली भारतीय वर्तमानपत्रे (इंग्लिश आणि देशी – दोन्हीही) ह्या बातम्या कां छापत नाहीत ..? या बातम्या सीएनएन, बीबीसी, न्यूजवीक अशा ठिकाणीच कां येतात. नक्की कोण थांबवतं आपल्या वर्तमानपत्रांना ..?

आपल्या वर्तमानपत्रांना काँग्रेसमध्ये फक्त राहुल गांधी कां दिसतो, दुसरं कां कोणी दिसत नाही? मला तरी कळत नाही,
पण हा पक्ष आता देश चालविण्याच्या लायकीचा नाही, हे मात्र नक्की ..! ते बऱ्याचशा गोष्टी ज्या चांगल्या घडत आहेत, त्याही बिघडवून टाकतील, हे नक्की ..!

बरेचसे असेही म्हणतील की मोदी हा रिलायन्स आणि अदानी समुहाचा खास माणूस आहे. तसं तर टाटांचाही मोदी खास माणूस आहेच की ..! आज टाटाला १००० करोडचं डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट मिळालं.
कारण काँग्रेस टेट्रा ट्रक (१० कोटींचा १ ट्रक) आर्मीसाठी बाहेरून आणत होते, पण आता ते टाटा बनवतात ..!!

आज आपल्या देशात ७०% जनता ही अशिक्षित आहे. निवडणूका आल्या की पैसे घेऊन मते देणं, हे त्यांचे काम. मग माझा असा प्रश्न, अशा अवस्थेत, कुठला असा पक्ष आहे जो कुठल्याही पाठिंब्या शिवाय, भ्रष्टाचाराशिवाय निवडणूक जिंकू शकतो? माझ्या मते कुठलाच नाही. किमान, निदान पुढच्या २५ वर्षांपर्यंत कुठलाही पक्ष पैसा ओतल्याशिवाय शिवाय जिंकूच शकणार नाही. भारतात निवडणुका जिंकायला प्रचंड पैसा लागतो आणि त्यानंतरच तुम्ही पंतप्रधान बनू शकता .. मग मोदींनी ते केलं तर त्यांत वावगं ते काय ..? निदान देशासाठी किती प्रचंड मेहनत घेतायत ते बघा.
अहो, हेच काँग्रेससाठी ‘डीएलएफ’ ने केलं ..!!

’डीएलएफ’ ने कांही दान-धर्म म्हणून तर काँग्रेसला मदत केली नव्हती, तोच हिशेब ..! देशच असा आहे त्याला मोदी किंवा मी किंवा तुम्ही काय करणार ..? एका सुदृढ लोकशाहीला मूळ धरायला खूप वेळ लागतो ..!!

आजही देशात १ लाख कोटीची वीज चोरीला जाते, मग मला सांगा त्या वीज चोरणाऱ्याला हक्क आहे कां, “कहाँ गये वो अच्छे दिन?”, असं विचारण्याचा ..? माझा ऑफिसचा ड्रायव्हर सांगतो, गावांत जाऊन तो फक्त खासदाराच्या ऑफिसात कर्जाचे फॉर्म भरतो आणि ५ एकरवर ५ लाखाचे कर्ज मिळते ..!! वर्षांअखेर ते माफ होते. ३०% आणि ७०% चा हिशोब ..! अशा लोकांना बोलायचा हक्क आहे कां, कुठे गेले ते ‘अच्छे दिन’, हे विचारण्याचा ..? अशा लोकांना शिक्षा करून देखील, आपण यंत्रणा सुधारू शकत नाही. कारण त्यामुळे चांगलं होणं तर दूरच, पण वाईटच जास्त होईल ..!!

कांही लोक मोदींना ‘चायवाला’ म्हणतात, मी एकच प्रश्न विचारतो मोदींचे कुठलंही भाषण ऐका. ते कितीतरी अशा गोष्टी सांगतात, त्या तुम्ही ऐकलेल्या पण नसतात .. देशाबद्दल आणि इतिहासाबद्दल एवढी माहिती असलेला नेहरूंनंतर हाच एक नेता, इतर कोणीही नाही. ‘चायवाला’ असला म्हणून तो विद्वान नाही, असे कसे शक्य होईल ..?

गुजरातला वरच्या पातळीवर नेणें, हे कांही साधे सोपे नव्हते. पण ते करून दाखवले. म्हणून तर त्याला वरती आणला गेलं, तेही पक्षात एवढी मोठी चढाओढ असताना .. खरं बोलायचं तर एवढं प्रचंड ‘सामान्य ज्ञान’ असलेला नेता मी अजुनपर्यन्त पाहिला नव्हता आणि मला स्वतःला सुद्धा माहित नाही ..!!

”हे काम नव्हे येऱ्या गबाळ्याचे, पाहिजे तिथे जातीचे!”, म्हणतात ते हेच ..

नवीन भारत घडतोय आणि तो कांही वेडावाकडा नाही तर, शिस्तबद्ध प्रक्रियेत वाढतोय आणि ही कांही फोफावून सांगितलेली वाढ नाही, खरी वाढ आहे ..!!

नवीन, तरुण मुलं रोज नव्या चांगल्या बातम्या आणत आहेत. आज इस्रो स्वतः पैसे कमवायला लागली आहे. अमेरिका आता आपल्याला तेल विकतेय तेही ‘ओपेक’ पेक्षा कमी भावात .. २ जहाजे ४० दिवसांचा प्रवास करून आली सुद्धा हल्दिया आणि पारादीप च्या बंदरात .. सन २०२४ पर्यंत आपल्या वीज गरजेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असू .. त्यानंतर आपली तेल आयात एकदम घटेल ..!!

’फास्ट ब्रीडिंग रिअॅक्टर’ रशिया फक्त आपल्याला द्यायला तयार झाला आणि १० अणुभट्टींचे काम चालू सुद्धां झालं आहे .. जगात इतर कोणाकडेच ह्या अणुभट्ट्या नाहीत. २ अणुभट्ट्या काम देखिल करत आहेत ..

4-जी ‘मल्टिपल-इनपुट अँड मल्टिपल-आऊटपुट’ टेक्नॉलॉजीची अंमलबजावणी सुरु झाली आहे ..!!

’कल्पसर’ ह्या परियोजनेचे नाव सुद्धा बऱ्याच जणांना माहित नसणार. हा २० नद्यांना एका धरणात अडवणारी महाकाय परियोजना आहे. हे चीनपेक्षा ही मोठं धरण असेल, जेंव्हा ते पूर्ण होईल ..!

’भारतमाला’ हा दुसरा महाकाय प्रोजेक्ट सन २०२२ पर्यंत पूर्ण होईल ..

अमेरिका आज आपल्याला ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स गन’ द्यायला तयार झाली … (डोकोलम चा फायदा भारताने उचलला ..!!)
कुठल्याही मिसाईलला आणि शत्रूच्या विमानाला हवेतच संपवणे – मग ते कितीही मोठे असो, तेही एका फटक्यात, हे या ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स गन’ ने सहजशक्य आहे आणि हे शस्त्र कांही प्रचंड महाग वा अवाढव्य नाही पण तंत्रज्ञान खूपच किचकट आहे. खरं वाटणार नाही या घडीला, पण
आपलं लष्कर हे चीनपेक्षा जास्त सुसज्ज आणि शक्तिमान आहे – तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ दोन्ही बाबतीत ..!!

जगात भारत हा एकमेव देश आहे, जिथे अमेरिका आणि रशिया दोघे मदत करताना मागेपुढे पाहत नाहीत. जिथे इस्रायल आणि अरब राज्यें दोघैही आपल्या बरोबर व्यापार करतात.
चीनला शह देण्यासाठी भारतापेक्षा मोठा मित्र नाही, हे जगाने मान्य केलं आहे.

प्रत्येक देशात विघातक प्रवृत्ती असतातच. आज ते काम कांही वृत्तपत्रे / कांही पत्रकार करत आहेत, त्यांना थोडं बाजूला ठेवा आणि बघा देश कसा नटतोय ते ..! विश्वास ठेवा, आपला देश घडत आहे ..!!

शेवटी कुठलाही पंतप्रधान मग तो मनमोहन असो वा मोदी, ‘अच्छे दिन’ तोपर्यंत आणू शकत नाही, जो पर्यंत जनता साथ देत नाही.

’अच्छे दिना’ची सुरुवात आपल्या पासून कशी होते ते एकदा बघाच ..!! डहाणूला मुलांनी समुद्र किनारा कसा स्वच्छ केला, हे खालील संकेतस्थळाला भेट देऊन पहा! हे आहे आपल्या भारताचं सत्व ..!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1370314336423845&id=100003358745981

त्या माणसाने तन-मन अर्पून देशाची सेवा केली आहे आणि करतोय .. आपली सर्व शक्ती पणाला लावतोय .. खोटे आरोप सहन करतोय .. कुटुंब तर संपूर्ण देशाला बनवलं आहे. स्वार्थी माणसांना न घेता, योग्य माणसांना योग्य ठिकाणी कामाला लावतोय ..
अजूनही एकही घोटाळा त्याच्या नावावर नाही ..!!

बस और क्या चाहिये? थोडा काम मैं भी तो कर लूं, मेरे अपने देश के लिये ..!!
बाकी कोणी कांहीही म्हणा, आपण मोदींवर खुश आहोत ..!!

*जय हिंद !!!

🇮🇳
*

                        **लेखक**
                        *अनामिक*

        *

🇮🇳
जय हिंद

🇮🇳
*

 186 Total Likes and Views

0 Comments

No Comment.