शिवाजी पार्कवर अखेर उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचा आवाज घुमणार आहे. शिंदे गटाला धक्का आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याची लढाई उद्धव ठाकरे गटाने जिंकली. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास ठाकरे गटाला हिरवा कंदील दाखवला. पालिकेने शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना, पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही असा शेरा मारत ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी दिली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची हमी ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात दिली.
सुप्रीम कोर्टात जे काही न्यायालयीन वाद सुरू आहे ते एकप्रकारचे दुष्टचक्र आहे… त्यात बरेच काही बोलण्यासारखे आहे. पण त्याचा दसरा मेळावा आयोजनाशी संबंध नाही, असं सांगत शिंदे गटाचा हस्तक्षेप अर्ज म्हणजे आमदार सदा सरवणकर यांचा अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला लावला. हा अर्ज फेटाळून लावताना ठाकरे गटाने हस्तक्षेप अर्जावर केलेल्या युक्तिवादाशी आम्ही सहमत असल्याचंही कोर्टाने म्हटलं.
शिवसेना पक्ष कोणाचा यात आम्ही जात नाही आहोत. तो वाद सुप्रीम कोर्टात आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. त्यात आम्ही जाण्याचे कोणतेही कारण नाही असेहे सांगण्यात आले.
148 Total Likes and Views