सुपरस्टार सलमान खानला मानले पाहिजे. आज त्याचे वय ५६ वर्षे आहे. ह्या वयातही त्याला डिमांड आहे. लोक रिटायर होतात त्या वयात सलमान खान चार सिनेमात काम करतोय. बिग बॉसचे १६ वे पर्व लवकरच सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही तो हा शो होस्ट करतो आहे. या पर्वासाठी सलमान खानने एक हजार कोटी रुपये मानधन घेतले अशी जोरदार चर्चा आहे. सोळाव्या पर्वाच्या लाँचच्या वेळी पत्रकारांनी त्याला छेडले तेव्हा काही खुलासा झाला. पण सलमान खरे बोलला की अर्धसत्य?
‘तुला खरंच फी म्हणून एक हजार कोटी रुपये मिळतात का?’ असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान म्हणाला, ‘इतकं मानधन मला आयुष्यात कधीच मिळणार नाही. इतकं मिळालं तर मी कधीच काम करणार नाही. माझ्याकडे वकील आणि इतर खर्च खूप आहे. तुम्ही अशा बातम्या चालवता. अशा अफवांची इन्कम टॅक्सवाले दखल घेतात आणि मला भेटायला येतात.’
सलमान खान हा शो होस्ट करणार नसल्याचीही माहिती मध्यंतरी आली होती. त्यावरही सलमानने भाष्य केलं. तो म्हणाला, ‘मी कधीकधी कंटाळतो, त्यामुळे लोकांना सांगतो की मी हा शो करणार नाही. पण असेच लोक मला शो करण्यास भाग पाडतात. मी नाही तर दुसरं कोण होस्ट करणार? निर्मात्यांकडे कोणताही पर्याय नाही, त्यामुळे ते माझ्याकडे येतात. त्यांच्याकडे कोणताही पर्याय असता तर ते माझ्याकडे कधीच आले नसते.”
यावेळी सलमान खानने सोळाव्या शोमधील पहिल्या सदस्याची ओळख करुन दिली. या स्पर्धकाचे नाव ‘अब्दू रोजिक’ असे आहे. तो मुळचा ताजिकिस्तानचा आहे. अठरा वर्षांचा अब्दू गायक आहे. त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. त्याने गायलेल्या हिंदी गाण्यांनाही नेटकऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. तो सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्येही झळकणार आहे.
246 Total Likes and Views