बुमराहचे पाठीचे दुखणे, वर्ल्ड कप हातून जाणार?

News Sports
Spread the love

येत्या  १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक सुरू होत आहे. वर्ल्ड कप तोंडावर आला  असताना भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे. खूप मोठा झटका  आहे. आपला   जलदगती हुकमी  गोलंदाज जसप्रीत बुमराह  पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. विश्वचषकच काय तर पुढचे पाच ते सहा आठवडे तो खेळू शकणार नाही. अगोदर रविंद्र जडेजा आणि आता जसप्रित बुमराह या दोन्ही हुकमी  खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकणे सोपे नसेल.

            पॉवर प्लेमध्ये धावांचा धडाका रोखण्यासाठी   बुमराह हे एक अस्त्र होते. तो एकदुसरी विकेट काढून द्यायचा. त्यामुळे समोरच्या गोलंदाजावरचे दडपण दूर व्हायचे. डेथ ओव्हरमधील दोन षटके ही बुमराहच टाकणार हे निश्चित असायचं. आता  डेथ बॉलिंग स्पेशालिस्टच नाही म्हटले म्हणजे अवघड काम होईल. चेंडू स्विंग होत असो वा नसो, खेळपट्टी बाऊन्सी असो वा नसो, बुमराह टिच्चून मारा करतो. त्याच्या ऐवजी  शमी आणि चहर या दोघांनी नावे चर्चेत आहेत. शमी हा देखील बुमराहसारखा स्ट्राईक बॉलर आहे. तो विकेट्स घेऊन देतो. मात्र धावाही देतो. त्याची डेथ बॉलिंग बुमराह इतकीच प्रभावी आहे असं आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही.  त्यामुळे अचानक आलेल्या ह्या संकटाशी टीम कसे सामोरे जाते ते पहायचे.


     बुमराला असे झाले आहे तरी काय?  चाहत्यांच्या मनात काळजी आहे.  त्याच्या  पाठीच्या मागच्या बाजूला  स्ट्रेस फॅक्चर झालं आहे. जेव्हा तुम्ही शरीराच्या एका भागावर जास्त ताण देता तेव्हा तुमच्या स्नायू किंवा हाडांना दुखापत होऊ शकते. त्यावेळी स्नायू किंवा हाडांना छोटं फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळे यासाठी शरीराच्या एकाच भागावर जास्त ताण पडू नये, याची काळजी घ्यायची असते. जेव्हा स्ट्रेस फॅक्चर होते, तेव्हा शक्यतो शस्त्रक्रीया टाळली जाते. त्यावेळी फिजिओथेरीपीवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे यावेळी बुमराच्या या स्ट्रेस फॅक्चरवर शस्त्रक्रीया न करता त्याला अन्य मार्गाने फिट करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे.

 205 Total Likes and Views

0 Comments

No Comment.