सपा नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन! वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Editorial
Spread the love

समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन (Mulayam Singh Yadav Death) झालंय. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास (Mulayam Singh Yadav Passes Away) घेतला. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या निधनाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाीय. गेल्या अनेक दिवसांपासून मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू होते.

मुलायम सिंह यांचा अल्पपरिचय
22 नोव्हेंबर 1939 मध्ये उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात जन्म झाला होता. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांची नेताजी म्हणून ओळख होती. 1967 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार बनले.

1992मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. 3 वेळी त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. 1996 ते 1998 दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची जबाबदारीही सांभाळली होती. मागच्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मेनुपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यक्त केलं दुःख
मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणातही स्वतःला सिद्ध केलं होतं. आणीबाणीच्या काळात ते एक महत्त्वाचे सैनिक असल्यासारखे होते, असं नरेंद्र मोही यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाने भारताला अधिक बळकटी दिली, असंही मोदी म्हणाले.

राष्ट्रहितासाठी मुलायम सिंह यादव यांनी नेहमी संसदेत महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं. ट्वीट करुन मोदींनी मुलायम सिंह यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलंय.

मुलायम सिंह यादव यांना यूरीन इन्फेक्शन झालं होतं. मागच्या रविवारी त्यांची ऑक्सिजन लेव्हलही कमी झाली होती. त्यामुळे त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून होती.

यादव कुटुंबीयही मुलायम सिंह यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करत होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी मुलायम सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची थेट रुग्णालयात जाऊन भेटही घेतली होती. दरम्यान, आता त्यांच्या निधनाच्या वृत्तानं राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी दुःख व्यक्त केलंय.

 175 Total Likes and Views

0 Comments

No Comment.