५०-६० वर्षापूर्वी रेखा म्हणजे बॉलीवूडचे सेन्सेशन होतं. तिचे आरस्पानी सौंदर्य, तिच्या अमिताभ बच्चन आणि इतर हिरोंसोबतच्या भानगडी चवीने चघळल्या जात. रेखा आता सिनेमात दिसत नाही. १० ऑक्टोबर हा तिचा ६८ वा वाढदिवस. वय वाढले. पण म्हातारपण तिच्या शरीरावर दादागिरी करताना दिसत नाही. ती अजूनही तशीच दिसते रसरशीत. रेखा ओ रेखा, जब से तुझे देखा…
जवानीतही रेखा गॉसिपमध्ये असायची. आजही न्यूजमध्ये आहे. तिचे खरे नाव भानुरेखा गणेशन. तिचे वडील शिवाजी गणेशन हे तेलगु सिनेमाचे मोठे हिरो. आई पुष्पवल्ली ही देखील हिरोईन. रेखाला खूप प्रसिद्धी मिळाली. पण बापाचे नाव तिला चिकटले नाही. मोठ्यांचे जग काही वेगळे असते. वयाच्या १६ व्या वर्षीच रेखाने तेलगु सिनेमात काम सुरु केले. त्यावेळी ती लठ्ठ होती. म्हणून तिची टिंगल व्हायची. पण पुढे तिने आपली फिगर बनवली. आजही तिचा फिटनेस तरुण नट्यांनाही लाजवतो. रेखाने आयुष्य भरपूर उपभोगले. अनेकांसोबत तिच्या अफेअरची चर्चा झाली. जितेंद्र, विनोद मेहरा, अक्षय कुमार,किरणकुमार, संजय दत्त यांच्यासोबत तिचे नाव जोडले गेले. अमिताभ बच्चन सोबतचे तिचे लफडे तर खूप गाजले. जया बच्चन हिने तर अमिताभला रेखासोबत काम करायला बंदी घातली होती. आपला नवरा बाहेर चरतो हे कुठली बायको सहन करेल? शेवटी रेखाचा नाद सोडून अमिताभने संसार वाचवला. विनोद मेहरासोबत तर लग्न करून रेखा मोकळी झाली होती. पण विनोदच्या आईने तिला घरात घेतले नाही. त्यामुळे रेखाचाही नाईलाज झाला. सौदर्य असून भागत नाही. नशिबात असावे लागते. रेखामध्ये काय कमी होते? शरीर, सौंदर्य, पैसा, कीर्ती…सारे काही हते. लग्नाची इच्छाही होती. तिने शेवटचा ट्राय मारून पाहिला. दिल्लीचा मुकेश अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याशी लग्न करून तिने मस्तपैकी संसाराची स्वप्ने रंगवली होती. पण इथेही नशिबाने दगा दिला. हा पुरुष मानसिक रुग्ण निघाला. त्याने आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. त्या नंतर तर रेखाची प्रतिमा नरभक्षक, घरफोडी अशीच रंगवली गेली. मुळात रेखा तशी नव्हती आणि नाही. तिने खूप भोगले आणि आजही भोगते आहे.
५० वर्षाच्या करिअरमध्ये तिने तब्बल १८० सिनेमे केले. तिच्या नावाला आजही भाव आहे. २८ कोटी रुपयाची प्रॉंपर्टी बनवली. पण खासगी आयुष्यात आज ती एकटी आहे. प्रत्येक स्त्रीला केसात कुंकू मळावे असे वाटते. रेखालाही तसे वाटते. त्यामुळे अनेक वेळा ती केसाच्या भांगात भरपूर कुंकू भरून समारंभात येते तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. हा सिंदूर कोणाच्या नावाचा? अशी चर्चा सुरु होते. भानगडी करण्याचे आता तिचे वय नाही. तिला मुळातच छान छान साडी, दागिन्यात नटण्याची आवड आहे. जोडीदार नाही म्हणून काय झाले. आपली आवड ती भागवते. आणि तिला ते शोभतेही. आजही हेवा वाटावा असे तिचे सौंदर्य आहे. काय रहस्य आहे? ती स्वतःची खूप काळजी घेते.. तेलकट अजिबात खात नाही. शाकाहारी आहे. पोळीभाजी खाते. अक्रोड, डाळींब तिला आवडते. झोपायच्या तीन तास आधी ती जेवते. रात्री झोपतेही लवकर. आणि उठ्तेही लवकर. सकाळी व्यायाम, बागकाम, डान्स, घरकाम हा तिचा रोजचा कार्यक्रम असतो. पॉजिटिव्ह विचार करा म्हणजे तुम्ही सुंदरच दिसाल अशा सोप्या शब्दात रेखा आपल्या जवानीचे रहस्य सांगते. पहा तुम्हाला जमतो का रेखाचा हा फंडा.
163 Total Likes and Views