मोठ्या लढाईसाठी भुजबळ यांना अिधक बळ मिळो….

Editorial
Spread the love

श्री. छगन भुजबळ ७५ वर्षांत पाऊल ठेवत आहेत. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय पटात जी नामवंत नेतेमंडळी आहेत ती हळूहळू…. एकस्ास्टी, पंचाहत्तरी आणि सहस्त्र चंद्रदर्शन म्हणजे एक्क्याऐंशीकडे सरकत आहेत.  काळ कोणाकरिता थांबत नसतो. पण, महाराष्ट्रातील अशा काही नेत्यांचे पुढे सरकणे अाणि नवीन िपढीने, या पुढे सरकणाऱ्या नेत्यांची नेमकी तीच जागा सार्थ करणे, हे दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे या पिढीनंतरचा महाराष्ट्र नेमका कसा असेल?….
श्री. छगन भुजबळ गेल्या ३५-४० वर्षांतील कोणालाही वजा न करता येणारे राजकारणातील नाव आहे… आणि त्यांचे नेतेपण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या बहुजनांच्या जातीचा फायदा अनेक नेत्यांना िमळाला, तो फायदा मिळण्याची शक्यता नसताना, छगन भुजबळ यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने आपली जागा तयार केली. जीवनाची सुरुवात आपल्या मातेसोबत भायखळ्याच्या भाजी आणि फळ मार्केटमध्ये  सुरू करताना त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळे करावे, हे निश्चित असणार…. त्याचवेळी शिवसेनेचा जन्म होणे… बाळासाहेब ठाकरे यांनी विविध जातींतील मराठी तरुणांना आवाज देणे आणि भुजबळ धावून जाणे, हे सारे जणू नियतीने घडवले… भुजबळ यांचा स्वभाव असा आहे की, एक घाव दोन तुकडे… तडजोडीची भाषा ते करत नाहीत. िदसायला उग्र…. वागायला आक्रमक…. पण मनाने अतिशय सरळ आणि साधा…. असा हा एक वेगळा नेता आहे. बाळासाहेबांमुळे अाणि त्यांच्या स्वत:च्या नेर्तृत्वाच्या गुणांमुळे शिवसेनेमध्ये त्यांनी त्यांची जागा बरोबर तयार केली. त्या काळात बाळासाहेबांनी विविध जाती जमातींमधील तरुणांना हेरून त्यांच्यात ‘मराठी आस्मिता’ फुलवली. त्यात मनोहर जोशी, सुधीर जोशी, छगन भुजबळ, लिलाधर डाके, दत्ताजी साळवी, साबीर शेख असे अनेक तरुण होते. या शिवसेनेच्या बळावर भुजबळ यांचा राजकारणात प्रवेश झाला. ते दोनवेळा मुंबईचे महापौर झाले…. आणि विशेष म्हणजे ज्या शिवसेनेला आज ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे, त्याच चिन्हावर शिवसेनेच्याच वतीने छगन भुजबळ यांनी मुंबईतील माझगाव मतदारसंघात पहिले आमदार म्हणून १९८५ साली विजय मिळवला. १९९० साली ते त्याच मतदारसंघातून निवडून आले.  आता शिवसेना पुन्हा मशालीकडून…. मशालीकडे आली आहे. नियती काही गोष्टी घडवत असते… मशाल हे चिन्ह शिवसेनेला धनुष्यबाणापेक्षा अिधक फलदायी ठरेल. शिवसेनेची प्रकृती, स्वभाव याला धनुष्यबाण िततकासा शोभत नव्हता. नियतीनेच पुन्हा मशाल हे िचन्ह शिवसेनेला दिले. त्याची सुरुवात छगन भुजबळ यांच्यापासून झाली. अाणि आता ितच मशाल घेवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भुजबळ हे प्रचारात अग्रभागी राहतील…
बाळासाहेबांच्या स्ाोबत असलेल्यांमध्ये चार-पाच मंडळी बाळासाहेबांच्या खास जिवाची होती. त्यात भुजबळ होते. पण, भुजबळांना एक गोष्ट सतावत होती की, महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा मोठा वाटा-संख्येने जास्त असताना-इतर मागासवर्गीय जाती-जमातींना का मिळत नाही? एकाच दुरडीत सगळ्या भाकऱ्या का वाढल्या जात आहेत? त्या काळात भुजबळ बोलत नव्हते… पण, याच विचारांनी ते अस्वस्थ होते. भुजबळांची पुढची राजकीय वाट मंडल आयोगाच्या अहवालानंतर अिधक मोकळी झाली. प्रश्ास्तही झाली… मंडल आयोगाने मागास जाती-जमातींची सगळी कुंडली उघड केली…. त्यात काही दोष होते… काही सामाजिक न्यायही होता.  भुजबळसाहेबांनी शिवसेना सोडण्यासाठी ही संधी नेमकी पकडली. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘संधी रोज मिळत नसते… आलेली संधी नेमकी पकडायची असते….’ भुजबळ यांच्या शिवसेना सोडण्यामागे काही तात्विक भूमिका होती. ज्या मोठ्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्यात राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, यांची कारणे व्यक्तीगत होती. त्यांच्या नेतृत्त्वाच्या भोवती ती िफरत होती. भुजबळ यांनी एक भूमिका घेवून सेना सोडली…. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींना उघडपणे विरोध केला  होता. इतर मागासवर्गीय समाजाला बाळासाहेबांचा हा मोठा धक्का होता. शिवसेनेला पुढे तो अडचणीचाही ठरला आहे. भुजबळ सेनेतून बाहेर पडले त्या काळात बाळासाहेब म्हणाले होते की, ‘शिवसेनेत येणाचा रस्ता मोकळा आहे…. बाहेर पडायचा रस्ता बंद आहे…’ त्या काळात बाळासाहेबांचा दराराही होता… आणि दहशतही होती. भुजबळांनी धोका पत्करून आपल्यासोबत काही नेत्यांना आणले आणि शरद पवार मुख्यमंत्री असल्यामुळे काँग्रेसमध्ये येणे त्यांना शक्य झाले. काँग्रेसमध्ये आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळ यांची संभावना ‘लखोबा लोखंडे’ या मार्मिक शब्दाने केली होती.  भुजबळही काही कमी नव्हते… त्यांनी अिधक कडक शब्द वापरून बाळासाहेबांना ‘टी बाळू’ म्हटले.  पण, त्यावेळच्या राजकारणात एकमेकांना टोले मारण्यात विखार कधी जाणवला नाही. बाळासाहेबांच्या बोलण्यातही विनोदाची एक झालर होती. आणि भुजबळांच्या टोल्यातही लहान मुलांच्या विटी-दांडू खेळातील एक गंमत होती. ‘टी बाळू’ नाव फक्त भुजबळच वापरत. पण, लखोबा लोखंडे या नावाने भुजबळ एवढे प्रसिद्ध झाले की, एकदा तर गंमतच झाली…  शिवाजी नाट्यमंिदरमध्ये ‘लखोबा लोखंडे’ हे पात्र जिवंत करणारे प्रभाकर पणशीकर आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले…. ‘ तो म्ाी नव्हेच…. या नाटकातील हजारा प्रयोगात लखोबा लोखंडेंचे काम केले… पण, महाराष्ट्राला लखोबा लोखंडे माहिती आहे तो…. माझ्यामुळेच… भुजबळांच्या मनाचा हा मोकळेपणा… टाळ्यांच्या कडकडाटात लोकांनी तो स्वीकारला.
भुजबळ हे जेवढे कडवे नेते आहेत…. तेवढेच मनाने ओलावा असणारे नेते आहेत. त्यामुळे त्या काळात टक्के-टोमणे यांना द्वेषाचा विखार नव्हता.  मनात दुष्टपणा नव्हता. त्यामुळे भुजबळ यांचे भाषण आक्रमक वाटले तरी कधी विखारी वाटत नाही… ही त्यांची विलक्षण हातोटी आहे….
आज भुजबळांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्ा त्यांनी िनर्माण केलेले आहे. शिवाय माळी समाजाचा असलेला नेता एका समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही. असंख्य मागासवर्गीय जातींना एकत्र करून त्यांनी उभी केलेली ‘महात्मा फुले समता परिषद’ महाराष्ट्रापुरती राहीली नाही. ती देशव्यापी झाली. त्याचे नेतृत्त्व भुजबळ यांच्याकडे आहे.  महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला एक झाकोळलेली किनार आहे. सत्तेचे वाटे टाकताना मागासवर्गीय जातींना त्यांच्या वाट्याला विषम वाटणी आलेली आहे. समाजवाद म्हणजे ज्याप्रमाणे श्रीमंतीची वाटणी अपेक्षित आहे… समाजावादात गरिबीची वाटणी होऊ शकत नाही… त्याचप्रमाणे समाजिक समता निर्माण करताना ‘सत्तेचे समान वाटे’ पडले पाहिजेत…. दलितांना आरक्षण देताना यशवंतराव चव्हाण यांची तीच भूमिका होती. भुजबळ त्याच भूमिकेवर उभे आहेत. त्यातूनच त्यांची समता परिषद उभी राहिली. आणि त्यात भुजबळ खंबीरपणे उभे राहिले. आज देशात जातीनिहाय जनगणनेची चर्चा आहे. भाजापापासून फारकत घेवून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्याच भूमिकेने बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रात ती भूमिका भुजबळ यांच्या नेतृत्त्वामुळे चर्चेत आहे.  देशात आज लोकसभेत आणि विधानसभेत महिलांकरिता समान जागांची चर्चा फक्त चर्चाच होवून राहिली आहे. ५० टक्के महिला मतदार आहेत… त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा ५० टक्के नाहीत. हा मुद्दाही आज चर्चेत आहे. देशातील सर्व मागासवर्गीय जातींची संख्या ५० टक्क्यांपेक्षा खूप जास्त आहे. आणि दिलेले आरक्षण जेमतेम २७ टक्के आहे. आरक्षण हा विषय अितशय जटील आहे. त्याची अंमलबजावणीही अवघड आहे. पण, आज तो विषय टाळून राजकारण पुढे जाणार नाही.  अशा भावनात्मक पातळीवर हे मुद्दे ऐरणीवर आलेले आहेत. अशावेळी भुजबळ यांचे नेतृत्त्व फार महत्त्वाची भूमिका बजावते. समाजात टोकाचे मतभेद न होता आणि जाती-जातींमध्ये विखार निर्माण न होता, हे मुद्दे चर्चेने सोडवले गेले पाहिजेत. ही भूिमका दोन्ही बाजूंना घ्यावी लागेल.  शिवाय ज्याला ओ.बी.सी. म्हणतात ती आर्थिकदृष्ट्या सशक्त अशी जमात नाही. त्यात फाटाफूटही आहे.  प्रकाश आंबेडकर हे बुद्धीमान नेते आहेत. त्यांची वंचित आघाडी ही एक प्रकारे ओबीसीचींच लढाई आहे. त्यामुळे ‘समता परिषद’ आणि ‘बहुजन वंचित आघाडी’ यांनी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेणे दोघांनाही राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. आणि एकमेकांचे नुकसान करणारा हा निर्णय ठरेल. सोलापूरमध्ये दलित समाजाचे असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना पाडण्याकरिता वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून खुद्द प्रकाश आंबेडकर उभे राहिले. ते पडले आिण सुशीकुमारांनाही त्यांनी पाडले.  हे असेच चालू राहिले तर, भुजबळ किंवा आंबेडकर यांना मुलभूत तत्त्वाची जी लढाई लढायची आहे ती कधीच लढता येणार नाही. म्हणून ‘इतर मागासवर्गीयांची एकजूट’ ही पहिली गरज लक्षात घेवून भुजबळांनी आपले पुढचे राजकारण उभे केले पाहिजे. त्यासाठी समंज्ास्य चर्चा आणि समाजाच्या भल्याचा विचार हेच दोन मुद्दे घेवून ही चर्चा होवू शकेल.
शिवाय श्री. छगन भुजबळ यांना एक सांगणे आहे…. आरक्षणाच्या लढाईत नोकऱ्यांच्या टक्केवारीचा विषय आहे…. समता परिषदेची भूमिका त्याच्या पलिकडे जाणार की नाही…. नोकरीतील आरक्षणाइतकेच इतर मागासवर्गीयांचे आर्थिक संस्थांचे नेतृत्त्व हाती येणे, तितकेच महत्त्वाचे आहे.  हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. अाणि नोकऱ्यांच्या मद्द्यावर भर दिला जातो. सहकारातील संस्था असतील… सामाजिक संस्था असतील…. अशा संस्थांमध्ये भुजबळांना अपेक्षित असलेल्या किती अन्य  मागासवर्गीयांकडे आर्थिक सत्तेची पदे आहेत.  िकती संस्थांमध्ये अध्यक्ष पदावर ओ. बी. सी. समजाचे नेते आहेत? जेव्हा अशी पदे हातात मिळतात तेव्हा आपोआपच अन्य जमातीतील गुणवत्तेच्या तरुणांना संधी देता येणे अिधक सोपे आहे. आज महाराष्ट्रात ओ.बी.सी.  समाजाचे कोणतेही नेते यादृष्टीने हा विचार करत आहेत, असे वाटत नाही…
भुजबळांना अपेक्षित असलेली ‘जातींची स्वतंत्र जनगणना’ आणि हा विषय केंद्र सरकार स्वीकारण्याच्या मन:सि्थतीत नाही. केंद्र सरकारला तो विचार सोयीचा नाही. आजचे भाजपाचे सरकार कोणताही निर्णय त्यांना राजकीयदृष्ट्या किती सोयीचा आहे… यावरच िनर्णय करत असते. ईडीच्या धाडी घालण्यामागची भूमिका सोय आणि गैरसोय हाच एक निकष मानला गेला आहे.  भाजपाला पुढारलेल्या जातींचा पाठींबा आहे.  त्यामुळे कष्टकरी आणि गरिबवर्ग प्राधान्याने ज्या समाजात आहे, त्या समाजाच्या मागण्या हे सरकार मान्य करणार नाही. भाजपाचे लक्ष शहरांवर केंद्रीत आहे… ‘स्मार्टसिटी’ ही कल्पना भाजपाच्या फायद्यासाठीच कागदावर आली आहे. बहुसंख्य असलेला इतर मागास समाज प्रामुख्याने खेड्यात विखुरलेला आहे. तो संघटीत नाही. त्यांना गाव आणि जिल्हा पातळीवर नेता नाही. त्यामुळे ही लढाई विषम आहे. आणि सध्या तरी छगन भुजबळ यांच्या समता परिषदेखेरीज दुसरे व्यासपीठ उपलब्ध नाही. आणि भुजबळांखेरीज दुसरा नेता नाही. म्हणून ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर भुजबळांना अिधक ताकतीने रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यावी लागेल. नेतृत्त्वात ते खंबीर आहेत. वक्तृत्त्वात ते धारदार आहेत… पण, ही लढाई स्थानिक नसून राष्ट्रीय पातळीवरची आहे. ती लढवण्यासाठी खूप मोठ्या जन आंदोलनाची गरज आहे. त्याचे नेतृत्त्व करण्यास भुजबळ यांच्याखेरिज महाराष्ट्राततरी दुसरा नेता नाही. सहस्त्रचंद्र दर्शनाकडे वाटचाल करताना भुजबळ यांना ही लढाई लढण्याचे बळ मिळो, हीच शुभेच्छा आपण या निमित्ताने देवू…
जीवनात अनेक संकटांचा सामना करून आरोप- प्रत्यारोपांना पुरून उरून…. प्रसंगी त्याची िकंमत चुकवून, छगन भुजबळ नावाचा एक नेता आपल्या पांढऱ्या स्वच्छ दाढीसकट लोकांसमोर आहे… काम करण्यात तो वाघ आहे… मंुबई- आग्रा रोड आणि नाशिकमध्ये प्रवेश करताना झालेला कायापालट हे भुजबळ यांचेच कर्तृत्व आहे.  माझगाव मतदारसंघातून थेट येवला मतदारसंघात अशी बदली झाल्यानंतरही भुजबळांनी एकही पराभव पत्करलेला नाही. आणि येवल्याचे सोने केले. येवल्याची पैठणी गाजते आहे. राजकारणातील भुजबळही सोन्याच्या पैठणीसारखेच महाराष्ट्राचे नेते म्हणून गाजत आहेत. ७५ व्या वाढदिवसानंतर अिधक तेजाने त्यांचे तेतृत्त्व सामान्य माणसांच्या हितासाठी लढत राहील… हीच शुभेच्छा!
– मधुकर भावे

 171 Total Likes and Views

0 Comments

No Comment.