योगगुरू बाबा रामदेव यांच्या एका वक्तव्याने बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ आहे. ‘सलमान खान ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल मला माहित नाही, आणि बॉलीवूडच्या अभिनेत्रींबाबत तर देवालाच ठाऊक’ असे बाबा रामदेव म्हणाले आहेत. पुढे ते म्हणतात, ‘शाहरूखचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला होता आणि त्यासाठी त्याला तुरूंगातही जावं लागलं होतं. सलमान तर ड्रग्ज घेतोच आणि आमिरचं सांगता येत नाही. खरं तर संपूर्ण बॉलीवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे.’
बाबा रामदेव त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते अलोपाथी डॉक्टरांवर तुटून पडतात तर कधी राजकारण्यांवर. आता ते बॉलीवूडवर घसरले आहेत. मुरादाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या आर्यवीर महासंमेलनाच्या व्यासपीठावरून बाबा रामदेव यांनी लोकांना अंमली पदार्थांचे सेवन न करण्याचे आवाहन केले. त्यावेळी सलमान खान या बड्या कलाकाराचं नाव घेत त्यांनी बॉलीवूडवर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या वक्तव्यानंतर आता सलमानच्या फॅन्समध्ये सलमान ड्रग्ज घेतो की काय? याची चर्चा सुरु झाली आहे. बाबांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. पण बॉलीवूडमधल्या कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही.
एकेकाळी रामदेव बाबांना गांभीर्याने लोक घेत. पण अलीकडे अनेकदा त्यांचा तो जातो. त्यामुळे खुद्द बाबांचा संप्रदाय नाराज आहे. बाबाने असे बोलू नये. ड्रग्ज घेणे गुन्हा आहे. तरीही कोणी घेतो असा बाबांचा दावा असेल तर त्यांनी तसा पुरावा पोलिसांकडे दिला पाहिजे असे भक्तांना वाटते.
245 Total Likes and Views