सरसंघचालकांवर टीकास्त्रे

Analysis
Spread the love

*हिंदू समाजात परिवर्तनाच्या लाटा निर्माण करणाऱ्यांवर टीकेचा भडिमार होणारच!*

      ब्राह्मण आणि उच्चवर्णियांचे चुकलेच, या भूमिकेवर नुकतीच कडक नाराजी प्रारंभ झाली आहे. ‘हिंदू- मुस्लीम डीएनए एक’, वरील टीका संपलेली नाही. ओबीसी-एसटी–एससी समाजातून सत्ताधारी निवडणे काहींना आजही पचत नाहीये. मोदी–भागवत जुळ्या भावंडासारखे वागतात, भांडत नाहीत, याची खदखद शिगेला पोचली आहे.

    बाळासाहेब देवरसांनी संघाला समाजमय केले, आंदोलनात उतरविले, यावरचा राग अजूनही गेलेला नाही.

    तरुणांचे लोणचे घालता, काहीच करीत नाही, असा प्रहार संघपरिवारसंस्थापक गुरुजी गोळवलकरांनी 33 वर्षे झेलला.

      इंग्रजांशी न लढता स्वतंत्र भारतासाठी रा.स्व. संघाला घडविले जात आहे, हे अनेकांना पटत नव्हते. 1937 पासून हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ यांच्यात भिंत उभी होणे, आजही 2022 साली, सावरकरभक्तांना मान्य नाही. डॅा. हेडगेवारांचा हिंदू एकही टक्का सांप्रदायिक नसून अमेरिकन-रशियन- चिनी- राष्ट्रीय संकल्पनेचा आहे, हे सत्य तर अनेकांना आजही पचविता येत नाही.

संघपरिवार ही संकल्पना हिंदू समाजाचे राष्ट्रीय संघटन आहे. संघपरिवार फक्त ब्राह्मणांचा, फक्त उच्चवर्णियांचा, फक्त क्लासेसचा नसून हिंदू सभ्यतेसमोरील आव्हानांना मिळत असलेला सृजनशील प्रतिसाद आहे. 2025 सालच्या संघ जन्मशताब्दीपर्यंत  संघपरिवाराचे यथार्थ आकलन ज्ञानवंतांना होवो, या प्रक्रियेतील दिलीप देवधरांचा लेखनप्रपंच!
•••••••••••••••••••••••••••••••••••••

*7 वे सरसंघचालक, डॉ. भागवत*

*2000 ते 2025 आव्हाने आणि प्रतिसाद*

      मार्च 2000 ला सरकार्यवाह आणि मार्च 2009 ला सरसंघचालक पदाची जबाबदारी डॉ. मोहन भागवत यांच्यावर स्वयंसेवकांनी सोपविली. 1925 ते 2000 या 75 वर्षांत हिंदू समाजाने प्रबलीत होण्याचे पायव्याचे भरभक्कम कार्य केले होते. 75 वर्षांच्या कार्यामुळे प्रमुख  संघपरिवार नेत्यांचा इगो शिखरावर पोचला होता. इगो क्लॅशमुळे 2004 साली समस्त संघपरिवार मोडकळीस आला होता. हिंदूंना संघटित करायला निघालेले  स्वत: असंघटित झाले होते. 2009 साली सातव्या सरसंघचालकपदाची ऐतिहासिक जबाबदारी भागवतांकडे आली. 2009 ते 2013 या काळात संघपरिवार ठीकठाक करण्यात त्यांचा काळ खर्च झाला. 2014 ते 2018 या काळात परिस्थितीचे विश्लेषण करून 2018 ते 2025 या काळासाठी संघपरिवार कार्याची दिशा संघपरिवार नेत्यांनी निश्चित केली. भूतकाळाचे ओझे दूर सारून, युगानुकूल पावले उचलण्याचे 2018 साली पक्के झाले.

*आव्हाने आणि प्रतिसाद*

    2018 साली हिंदू समाजाचे आणि संघपरिवाराचे स्वॅाट असेसमेंट करण्यात आले. वीकनेसेस म्हणजे कमजोरी, मूर्खपणाची आवड, आणि थ्रेट्स म्हणजे धोके सप्टेंबर 2018 च्या पूर्वी निर्धारित केले गेले. आव्हानांची यादी तयार करण्यात आली. *सर्वप्रथम राष्ट्र व संघ विरोधकांनी संघाची चुकीची प्रतिमा केली आहे तिचे रूप समजून घेण्यात आले.*

*संघ मुस्लीमविरोधी आहे -* हिंदूंना संघटित करणे म्हणजे मुस्लिमांना विरोध करणे, असा प्रचार करण्यात आला होता. मुस्लिमांच्या मनात हिंदूद्वेष पेटवून मुस्लीम व्होट बँक उभी केली होती.
*संघ ब्रह्मणांचा -* हिंदूधर्म म्हणजे चातुर्वण्य, हिंदू म्हणजे उच्चनीचता, हिंदू म्हणजे अस्पृश्यता असा खोटा प्रचार हिंदूविरोधी स्पीन-डॉक्टरांनी रुजविला होता. ‘डिव्हाईड अॅंड रूल नीती’ विदेशी आणि स्वदेशी सत्ताधाऱ्यांनी रात्रंदिन वापरली होती.
*संघ आरक्षणविरोधी -* मनुस्मृतीच्या समर्थकांचा आरक्षणाला समूळ  विरोध आहे, अशी बनवाबनवी सर्वदूर पसरविली होती. यामुळे बहुसंख्य हिंदूंची मते संघटित होऊच नयेत याची खबरदारी विरोधक घेत होते.
*संघ राज्यघटना विरोधी -* 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना संमत होताच त्यानंतर लगेच घटना बदलणारे देशी सत्ताधारी संघपरिवार घटनाविरोधी आहे, असा प्रचार करून घराणेशाही रुजविण्याचे कटकारस्थान करीत होते. घटनेचे स्पिरिट आणीबाणी पर्वात पायदळी तुडविणारे संघ घटनाविरोधी आहे, याचा जप करीत होते.
*संघ लोकशाहीचा शत्रू -* सरंजामशाहीच्या घराणेशहांनी तसेच डिक्टेटरशिप अॅाफ प्रोलेटारिएटचा ध्यास घेणारे निवडणुकीतून सत्तेवर येणाऱ्यांना हुकुमशहा म्हणत होते.
*संघ जुनाट, कालबाह्य -*  हिंसावादी, नक्षलवादी आणि जिहादी तत्त्वे ‘कृषि-उद्योग सभ्यते’च्या नेत्यांना हाताशी धरून थर्ड वेव्हच्या संघपरिवाराला जुनाट, कालबाह्य आणि प्रतिगामी रंगात चित्रित करीत करण्यात मश्गूल होती.
*संघ पूंजीपतींचा -* सर्वाधिक संख्येच्या भारतीय मजदूर संघाला, प्रचंड संख्येच्या वनवासी कल्याण आश्रमाला आणि जनसामान्यांच्या 36 संघटनांना पुंजीपतींची फौज म्हणण्याची बदमाशी भ्रष्ट सत्तादलाल करीत होते.

*‘भागवत-मोदी’ कार्यक्रम*

*समर्थ-समृद्ध भारतासाठी संघपरिवार टाकीत असलेल्या पावलांची सूचि-*

*भारत शूद्रोका होगा-* स्वामी विवेकानंद संघस्वयंसेवकांचे स्पेशल-हीरो आहेत. ‘भारत शूद्रोका होगा’, ही स्वामींची द्रष्टेपणाची गर्जना संघविश्वात गुंजत असते. भूतकाळात सवर्णांकडून शूद्रांवर अन्याय झालेत याची टोचणी प्रचारकांना सतावत असते. हिंदूंच्या कमजोरीला आक्रमकांनी वापरून भारताला गुलाम केले होते, याची जाणीव संघवाल्यांना आहे.
        2047 पर्यंत शेड्यूल्ड कास्ट्स, शेड्यूल्ड ट्राईब्ज, ओबीसी यांचे प्रबळ नेतृत्व उभारण्याचे संघाने ठरविले आहे. संघ परिवाराचे, भारतीय जनता पक्षाचे आणि देशाचे टॅाप मोस्ट  लीडर्स बहुजन समाजातील आहेत. कॅांग्रेस-कम्युनिस्टांचे उच्चपदस्थ नेते उच्चवर्णीय आहेत. ही वस्तुस्थिती योगायोग नसून व्हिजन इन अॅक्शन आहे.
*सत्तादलालांवर बुलडोझर -* घटनेच्या मर्यादेत काम करणाऱ्या एजन्सीज सत्ता दलालांच्या खजिन्यावर तुटून पडत आहेत. काळा पैसा म्हणजे करचोरी म्हणजे सरकारची अकार्यक्षमता! गरिबी हटाव, बेकारी निर्मूलन आणि महागाई नियंत्रणासाठी ‘ई-गव्हर्नन्स’, पारदर्शकता, कार्यक्षमता, ज्ञानयुगीन व्यवस्थापन परवलीचे शब्द आहेत.
*अंत्योदय -* करसंग्रह वाढताच पैसा अंत्योदयासाठी उपलब्ध होतो. मोदींचा मासेस मंत्र झालाय. याच्यामागे संघाचे व्हिजन आहे, संघपरिवाराचे लॅाबिंग कारणीभूत होत आहे.
*घराणेशाही सरंजामशाहीचा अवशेष -* भाजप आणि संघपरिवारातील सर्वच संस्था घराणेशाही संपविण्याच्या क्रांतिकार्यात गतिमान आहेत. 21 वे शतक जनसामान्यांचे आहे, हे सरसंघचालक भागवत यांनी फारच लवकर समजून घेतलेले दिसते.
*महिलानेतृत्व 33% ते 50% -* हिंदू समाजात स्त्रीला देवतेचा दर्जा देऊन चार भिंतीत अडकवून ठेवलेले दिसते. 2000 पासूनच ‘महिला समन्वयकपद’ संघपरिवारात निर्माण करून 36 संघटनांमध्ये नेतृत्व देण्याची कार्यप्रणाली रा. स्व. संघाने उत्क्रांत केली आहे. लवकरच 33 % महिला आरक्षण भारतात प्रारंभ केले जाईल.
*डिजिटलायझेशनची लाट -* माहितीतंत्रज्ञान ज्ञानयुगात भारत अग्रेसर व्हावा यासाठी संघपरिवार द्रुत गतीने कार्यरत आहे. भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात संघपरिवाराचे हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर विकसित झाले आहे. संघसृष्टी लाख करोडहून जास्त मूल्याची आज उभी झाली आहे.
*सृजनशील होली टूरिझमने जीडीपी ग्रोथ -* गत हजार वर्षात झालेल्या विध्वंसापेक्षा कितीतरीपट नवनिर्मिती  सुरू आहे. रिलिजनची जागा सिव्हिलायझेशन कल्पनेने व्यापली आहे.
*हिंदू समाजातील दोषांच्या रक्षणकर्त्यांवर टीका करणे प्रारंभ -* हिंदू समाजातील दोषांच्यावर बौद्धिक प्रहार करून सुधारणांचे पर्व प्रारंभ झाले आहे. चुकांवर पांघरूण न घालता परिवर्तन करणे परवलीचे वाक्य होत आहे.
*मल्टिकम्युनल फोर्सेसचा पर्दाफार्श-* इस्लामिक स्टेटचे एजन्ट्स सरकारच्या रडारवर असून घराणेशाहांची मल्टिकम्युनल अॅक्टिव्हिटी उघडकीस आणली जात आहे. माहितीच्या प्रस्फोटामुळे चारित्र्यहीनांवर प्रकाशझोत टाकणे सुरू झाले आहे.
*भारताचे उद्योजक वैश्विक होण्यासाठी सरकारी मदत -* भारतीय  उद्योजकांच्या अश्वमेध यज्ञाला उगडपणे भ्रष्टाचारविरहित सहकार्य सरकारने प्रारंभ केले आहे.

*सरकार आणि समाज*

      सरकार 2014 पासून धावत असून समाजाने तसेच संघपरिवारातील 36 संस्थांनी मागे राहू नये याची खबरदारी हजारो संघप्रचारक घेत आहेत. संघर्षाशिवाय विकास नाही, याची संघनेत्यांना परिपूर्ण कल्पना आहे. 21 व्या शतकात संघ ग्लोबल प्लेअर झाला असून कौशल्याने लॅांग टर्म प्लॅनिग -एक्झिक्युशन होत आहे.
        भारतीयांमध्ये राष्ट्रवादाचा संस्कार नसल्यामुळे समाजात गोंधळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. देशात विदेशी शक्तींचे एजंट सर्वदूर जाळे निर्माण करून पंचस्तंभीय कारवाया करतात, या माहितीतून अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा वाढविली जात आहे. विदेशी तत्त्वांशी गनिमी काव्याने संघर्षाची व्यूहरचना केलेली आढळते.
          2014 पासूनचे प्रत्येक पाऊल भ्रष्टांना घायाळ करीत असल्यामुळे त्यांची वळवळ वाढणे स्वाभाविक आहे. दोषींना कडक शिक्षा करण्याची प्रक्रिया त्यांची अस्वस्थता वाढविणारच! बुद्धिभेद करण्यासाठी अनेक भाडोत्री मेंदू ओव्हरटाईम करतांना दिसतात.
  संघपरिवार दोषांचे निर्मूलन करण्यासाठी, भारतीयांच्या सुधारणांसाठी,  युगानुकूल परिवर्तन करण्यासाठी कंबर कसून उभा आहे. भागवत-मोदी या जुळ्या भावंडांच्या पाठीशी हिंदू समाज श्रद्धेने उभा आहे,  संकुचित स्वार्थ, वाचाळपणा, आक्रस्ताळेपणा सृजनशील संघर्षाला थांबवू शकणार नाही. समर्थ-समृद्ध भारतासाठी जास्तीत जास्त नवीन सहकारी-भागीदार संघटनांची बेरीज करण्याची भूमिका यशस्वी होईलच. भारतीय सभ्यतेसमोरील 21 व्या शतकातील आव्हानांना युगानुकूल/लवचिक प्रतिसाद 2025 आणि 2047 साली नवा इतिहास घडवील.

दिलीप देवधर*
*संयोजक: डॉक्टर हेडगेवार ज्ञानपीठ*

 717 Total Likes and Views

0 Comments

No Comment.