मशालीकडून…. मशालीकडे ….

Analysis
Spread the love

शिवसेनेला  मशाल िचन्ह मिळाले. पूर्वीच्या धनुष्यबाण िचन्हापेक्षा हे िचन्ह अधिक प्रभावी आहे. शिवसेनेेने पहिली निवडणूक याच चिन्हावर लढवली. छगन भुजबळ हे उमेदवार होते. १९८५ हे साल होते. आता पुन्हा शिवसेना ‘मशालीकडून मशालीकडे’ आलेली आहे. धनुष्यबाणापेक्षा शिवसेनेच्या प्रकृतिशी अिधक जवळीक असलेले हे चिन्ह आहे. दसरा मेळावा शिवसेनेने जिंकल्यातच जमा होता. कोणाचा मेळावा सरस झाला, हे सांगण्याची गरजच नाही. लोक दोन डोळ्यांनी पहात नाहीत…. लाखो डोळ्यांनी पाहतात. त्यामुळे कोणी काहीही सांिगतले तरी, शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा जबरदस्तच झाला. आता त्यांना नेमके चिन्ह मिळालेले आहे. या निर्णयाने शिवसेनेमधील सगळी मरगळ झटकली जाईल. कोणी मानो, न मानो मुंबईतील जे नागरिक शिवसेनेचे नाहीत त्यांनाही मुंबईत, ठाण्यात, औरंगाबादमध्ये शिवसेना असली पाहिजे, असे मनापासून वाटते. लोक उघड बोलत नसतील, पण मतपेटीतून ते बोलतात. आताही बोलतील… शिवाय ज्या पद्धीतीने शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला ते मराठी माणसाला अिजबात अवडलेले नाही. घरात आरडा-ओरडा करणारा माणूस एकवेळ पत्करतो… पण, मौन धारण केलेला माणूस घराला अधिक अस्वस्थ करतो. अनेकवेळा अनेक घरांत अगदी सरळपणे सांगतात… ‘अरे, तुला काय सांगायचे आहे ते मोकळेपणाने सांगून टाक… पण असा अबोला ठेवू नकोस… गप्प राहू नकोस…’ या गप्प राहण्यात एक सामर्थ्य आहे. योग्य वेळी या मनातील घुसमटीला वाचा फुटेल. तो दिवस जवळ येतोय.. मशाल चिन्ह मिळाल्यामुळे िशवसेना अिधक प्रभावी ठरेल. या िचन्हाचेच हे सामर्थ्य आहे.
शिवसेनेला हे चिन्ह मिळाले आणि मला १९४८ साल आठवले. तेव्हा मी नऊ वर्षांचा होतो.  रोह्यात सानेगुरुजी आले होते… त्यांनी आम्हा मुलांना एका मंदिरात खूप गाणी शिकवली. त्याच्यामध्ये….
‘खरा तो एकचि धर्म…
जगाला प्रेम अर्पावे….’
हे एक गाणे होते. दुसरे गाणे होते…

‘आता पेटवू सारे रान…
एकजुटीची मशाल घेवून
उडवू दाणादाण…. ’

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ही िनशाणी आणि हे गाणे खूप उपयोगी पडेल…
शिवसेना आज ५६ वर्षांची आहे. दिल्लीचा एक मंत्री मुंबईत येवून ‘शिवसेनेला भस्मसात करू….’ अशी प्रतिज्ञाा जाहीरपणे करतो… मराठी मन हे मान्य करू शकणार नाही… इतिहासात याचे खूप दाखले आहेत. दुसऱ्या कोणीतरी येवून, मराठी नेत्यांना हाताशी धरून एक तगडी संघटना तोडावी, हे महाराष्ट्र मान्य करणार नाही. कोण खरे…. कोण खोटे…. याचा निर्णय महाराष्ट्र करेल. सत्तेवरच्या लोकांना सत्तेमुळे असे वाटते अाहे की, आपण काही करू शकतो. जगात असा समज असलेल्या अनेक नेत्यांना मतदारांनी जागा दाखवून दिलेली आहे. १९७७ साली ज्या मतदारांनी इंदिरा गांधी आणि त्यांच्या पक्षाला पराभूत केले त्याच मतदारांनी अवघ्या तीन वर्षांत इंदिरा गांधी यांना सत्तेवर आणून बसवले.  देशातील सर्वोच्च न्यायालयापेक्षा अिधक श्रेष्ठ असे सामान्य मतदारांचे मत आहे. त्यामुळे प्रचार, प्रसारवाहिन्या, एकेकाळची काँग्रेसची वृत्तपत्रे यांनी सोयीनुसार भूमिका बदलल्या तरी सामान्य मतदार आहे त्याच जागेवर आहे. त्याची प्रचिती योग्यवेळी येईल. लांब उडी मारताना अाधी चार पावले मागे जावे लागते आणि मग उंच झेप घेता येते. आताच्या शिवसेनेच्ाी कसोटी आहे. पण, कसोटीमध्येच परीक्षाही आहे. आणि या परीक्षेत मशालीचे कर्तृत्त्व अिधक तेजाळून निघेल.
मशाल िचन्ह हे ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीही स्वाभिमानाचे लढे जिथे जिथे झाले त्या राणा प्रतापानेही िचत्तोडगडच्या लढाईत मशाल तेवत ठेवली होती.  छत्रपतींच्या सर्व लढायांच्या साक्षीदार मशाली आहेत. त्यामुळे धनुष्यबाण गेला ते फार बरे झाले. नियतीला जे मान्य होते तेच चिन्ह मिळाले.
शिवसेनेच्या विरोधात आज जे आहेत त्यांना काही दिवसांनीच पश्चाताप होईल. भाजपाचा चेहरा त्यांना मािहती नाही. अनेक चेहऱ्यांनी भाजपा वावरतो. जिथपर्यंत त्यांना मूळ शिवसेनेच्या विरोधातील मंडळी उपयाेगी आहेत ितथपर्यंत त्यांना वापरून घेतले जाईल. ज्या दिवशी त्यांचा उपयोग संपेल, त्या दिवशी भाजपाचा आजचा चेहरा गळून पडलेला असेल आणि नवीन मुखवटा चढलेला असेल, हे िलहून ठेवा. आजच परिस्थिती अशी आहे की, मूळ शिवसेनेच्या विरोधातील मंडळींना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लहान करून मोदी- शहा यांचे फोटो बाळासाहेबांच्या दुप्पट मोठे करून लावावे लागत आहेत. काही दिवसांनंतर बाळासाहेबांचा फोटोही अलगद बाजूला होईल. कटू असले तरी सत्य आहे… भाजपाच्या अध्यक्षांनीच जाहीर केले आहे की, ‘या देशात फक्त भाजपा राहिल… आम्ही विरोधकांना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही…’ समजनेवालेको इशारा काफी हैं…. ज्यांना हे समजणारच नाही त्यांना सगळ्याच गोष्टीचा पश्चाताप करावा लागणार…. सध्या एवढेच….
– मधुकर भावे

 649 Total Likes and Views

0 Comments

No Comment.