अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून प्रचाराचा अफलातून फंडा !

News
Spread the love

अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी निवडणूक पार पडणार आहे. त्याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या (uddhav Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (rutuja latke) यांच्या प्रचारासाठी पक्षाने अफलातून फंडा वापरला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून मशाल चिन्हं घरोघरी पोहोचवण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचं निमित्त साधून ठाकरे गटाने उटण्याच्या पाकिटातून मशाल हे निवडणूक चिन्हं घरोघरी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे केवळ अंधेरीतच नव्हे तर संपूर्ण मुंबईत उटण्याच्या पाकिटातून मशाल चिन्हं घरोघरी पोहोचवले जात आहे. निवडणूक अंधेरीत जरी असली तरी मशाल चिन्हाचा प्रचार ठाकरे गटाकडून संपूर्ण मुंबईत करण्यात येत आहे. तसेच ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी मशाल यात्रा काढण्यात येत असून दिवाळीच्या तोंडावर उटण्याच्या पाकिटाच्या माध्यमातून मशाल निवडणूक चिन्हाविषयी लोकांना माहिती देण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक : पोटनिवडणुकीत ठाकरेंना दिलासा देत भाजपचा पुढील मार्ग केला..

राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात सत्तासंघर्ष अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवणे हे ठाकरे यांच्या शिवसेनेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. विविध विभागातील कार्यकर्ते सकाळ-संध्याकाळ घरोघरी फिरून मशाल या निवडणूक चिन्हाचा प्रचार करणार आहेत. यामाध्यमातून येत्या महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून पक्षाचा प्रचार होण्यास मदत मिळेल.

 121 Total Likes and Views

0 Comments

No Comment.