प्रत्येकाने किमान सात तास झोप घेतलीच पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी एवढी झोप आवश्यक आहे. तुम्ही फक्त पाच तासांवर झोप निपटवत असाल तर आयुष्यात पुढे अनेक गंभीर आजार तुम्हाला घेरू शकतात. एका सर्व्हेक्षणाचा हा निष्कर्ष आहे. काही व्यक्तींना झोपेत वेळ घालवणे व्यर्थ वाटते. त्यांच्यासाठी तज्ञांचा हा इशारा आहे.
या सर्वेक्षणासाठी ७००० लोकांचा अभ्यास करण्यात आला. २५ वर्षात त्यांनी किती वेळ झोप घेतली व त्यांना हृदयविकार, मधुमेह किंवा कर्करोग यासारखे दोन किंवा अधिक दीर्घकालीन आजार आहेत का? ते तपासण्यात आले. पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेत असलेल्या ५० वर्षाच्या व त्यावरील वयोगटातील व्यक्तींना दीर्घकालीन आजारांचा २०% अधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तींना दोन किंवा त्याहून अधिक आजार होण्याची शक्यताही ४०% अधिक आहे. तर ज्या व्यक्ती किमान ७ तास झोप घेतात त्यांच्या शरीरात आजाराची लक्षणे कमी प्रमाणात आढळून आली आहेत. तुम्ही किती तास झोप घेता यावर शरीरातील सर्व मज्जासंस्थेसंबंधी, चयापचय क्रिया अवलंबून असतात. झोपेच्या अभावामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होऊ शकतात. श्रीमंत लोकांमध्ये कमी झोपण्याची प्रवृत्ती आढळते. जास्त झोपणे म्हणजे वेळ फुकट घालवणे असे ते समजतात. अशा लोकांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
739 Total Likes and Views