शिंदे गटाची खेळी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

Editorial
Spread the love

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आपल्या सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्याचं लवकरच नियोजन करण्यात येणार आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याने ही शिंदे गटाची मोठी खेळी मानल्या जात आहे. अयोध्या दौऱ्याच्या (Ayodhya Tour) माध्यमातून शिंदे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे. (eknath-shinde-to-visit-ayodhya-soon)

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले होते. महंताचे आमंत्रण स्वीकारत शिंदे आता अयोध्येला जाणार आहे.मात्र, शिंदे यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. महापालिका निवडणुकीपूर्वीच हा दौरा होणार असल्याची माहिती आहे.

महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाकडून हिंदू मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिंदे गटानेही याकरिता कंबर कसली आहे.

 123 Total Likes and Views

0 Comments

No Comment.