मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गुजरातचे की महाराष्ट्राचे? आम आदमी पक्षाचा सवाल

Nagpur News
Spread the love

नागपुर :- नागपुरात येणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून आम आदमी पार्टीने (AAP) आज शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) निषेधार्त नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सद्बुद्धी यावी म्हणून महायज्ञ आंदोलन करण्यात आले. आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, शहर सचिव भूषण डाकुलकर नागपूर, उपाध्यक्ष शाहिद अली जाफरी, रोशन डोंगरे, लक्ष्मीकांत दांडेकर, मनोज डाफळे, अजय धर्मे प्रामुख्याने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महत्वशील दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून पळवून नेण्याचा मोठा डाव गुजरातने केला. त्यावर मात्र महाराष्ट्र सरकार म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार करत तरी काय आहे? हे सरकार गुजरातच्या दावणीला बांधले गेले असा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करून देणारा वेदांता फॉक्सकॉन व टाटा एअरबस प्रकल्प हा महाराष्ट्रात आला खर पण सरकारच्या निर्लज्ज धोरणामुळे तो गुजरातला गेला. त्यावर ना मुख्यमंत्री शिंदे ना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलण्यास तयार आहे. ते केवळ माविआ सरकारवर टीका करण्याचा मग्न आहेत. मात्र या प्रकल्पास रोखण्यास कुठल्याही प्रकारे उपाय करण्यास तयार दिसत नाही, असा आरोप यावेळी आम आदमी पक्षाने केला.

एवढया मोठ्यावर महाराष्ट्रातील रोजगार जातो आहे यावर लक्ष द्यायला व बोलायला फडणवीस यांना वेळ दिसत नाही. आता आम आदमी पार्टी शांत बसणार नाही या सरकार विरोधात तीव्र आंदोलन करू. प्रकल्प नव्याने आणण्यास भाग पाडू, असा इशाराही दिला.

 207 Total Likes and Views

0 Comments

No Comment.