बच्चू कडू राज्यमंत्र्यांऐवजी आता मंत्री होतील ; एकनाथ खडसेंचा दावा

News Politics
Spread the love

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात मोठा वाद सुरु होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीने दोन्ही नेत्यांमधील वाद संपुष्टात आला आहे. रवी राणा (Ravi Rana) यांनी देखील आपले अपशब्द मागे घेत दिलगीरी व्यक्त करतो असे म्हणत माघार घेतली आहे. मात्र, या वादावर स्पष्टपणे न बोलता बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेबाबत सप्सेंस ठेवला आहे. कार्यर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाष्य केले.

बच्चू कडू (Bachchu Kadu) राज्यमंत्र्यांऐवजी आता मंत्री होतील असा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांचं हे आपसातलं भांडण होतं हे भांडण वाढू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. भांडण मिटवण्याचा प्रयत्न म्हणजे तेरी भी चूप, मेरी भी चूप असा प्रकार असल्याचा टोला देखील एकनाथ खडसे यांनी लगावला.बच्चू कडूंनी सात आठ आमदार घेवून बाहेर जाण्याचं म्हटलं होते. त्यामुळे आता ते पुढच्या कालखंडात राज्य मंत्र्यांच्या ऐवजी फक्त मंत्री होतील असेही खडसे म्हणाले.

 350 Total Likes and Views

0 Comments

No Comment.