बॉलिवूडमधली हिट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई-बाबा झाले आहेत. आलियाने मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच तिला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या.
बाळाला जन्म दिल्यानंतर आलियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती आमचं प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही पालक झालो आहोत” अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. त्याबरोबर तिने सिंहाच्या कळपाचा फोटोही शेअर केला आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात अवघ्या २९ वर्षे वयाची आलिया आई झाली. लग्नाआधी गरोदर राहिलेली ही पहिली नटी नाही. नेहा धुपियापासून सारिकापर्यंत मोठी यादी आहे. हे बॉलीवूड आहे. इथे सारे चालते, धावते आणि खपतेही.
548 Total Likes and Views