८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे अशा कुटुंबातल्या व्यक्तींना मिळेल EWS आरक्षण

Editorial
Spread the love

आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. केंद्र सरकारने १०३वी घटनादुरुस्ती करुन सवर्ण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणाची तरतूद केली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळं देशभरात आर्थिक आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१९मध्ये मोदी सरकारने विधेयक मंजुर केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात जवळपास ४० याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकतं. हे आरक्षण एससी, एसटी, एनटी यांच्यासाठी नसून ओपन कॅटगरीसाठी आहे. खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. SC, ST, OBC आरक्षणातील लोकांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना नोकरीत व शिक्षणात आरक्षण मिळू शकते.
          तथापि, यासाठी खूप सारी कागदपत्रे   सदर करावी लागणार आहेत. ती  अशी. आरक्षणासाठी पात्र व्यक्तीच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा अधिक नसावी. १ हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र नसावं. महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचं रहिवासी घराचं क्षेत्र ९०० चौरस फुटापेक्षा जास्त नसावं. गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १८०० चौरस फूट जागेची अट आहे.  प्रमाणपत्र मिळवण्यापूर्वी, तुम्हाला EWS चा अर्ज डाउनलोड करावा लागेल. तो भरल्यानंतर, फॉर्ममध्ये विचारलेल्या कागदपत्रांसह ते तहसील कार्यालयात जमा करावे लागतील. तिथून पडताळणी केल्यानंतर तुम्हाला EWS प्रमाणपत्र मिळेल.

         यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा. लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड.लाभार्थी व त्यांच्या वडिलांची TC / निर्गम उतारा.लाभार्थी व त्यांच्या वडिलांची TC / निर्गम उतारा.  रेशन कार्ड. रहिवाशी प्रमाणपत्र. रहिवाशी प्रमाणपत्र.उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, ८अ / फॉर्म १६ / आयकर भरल्याचा पुरावा). रहिवाशी प्रमाणपत्र.उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, ८अ / फॉर्म १६ / आयकर भरल्याचा पुरावा). अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा. स्वघोषणा पत्र. ह्या सर्वांसोबत ३ पासपोर्ट फोटो लागणार आहेत.

 197 Total Likes and Views

0 Comments

No Comment.