जितेंद्र आव्हाड राजीनामा देणार ; टि्वटमुळे चर्चेला उधाण

Editorial
Spread the love

गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली.

आव्हाडांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या.पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या ..उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत,असे ट्विट आव्हाड यांनी केले.

कार्यक्रमांच्या निमित्ताने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आव्हाड एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यादरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि ती महिला आमने-सामने आले. आव्हाडांनी त्यांना बाजूला करुन पुढे गेले . यावेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केला असल्याचे त्या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आव्हाडांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलले, असा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात त्या महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.

 151 Total Likes and Views

0 Comments

No Comment.