अमृता म्हणाल्या, आम्ही ब्राह्मण याचा आम्हाला गर्व

Analysis
Spread the love

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य करून एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

  नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमृता बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे इत्यादीउपस्थित होते.
       अमृता फडणवीस म्हणाल्या, “आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे, पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. ही आमच्यात कमतरता नाही, पण आम्ही असं करत नाही. आमचं तसंच दिसून येतं.”
         “आमची ती महानता तशीच दिसून येते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस न मागता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कधीच हे पद मागितलं नाही. देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांची लोकसेवा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरच्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असं त्या म्हणाल्या. 

 644 Total Likes and Views

0 Comments

No Comment.